कांदा-मिरची जपून कापा..त्यात ड्रग्ज असू शकतं!

 Mumbai
कांदा-मिरची जपून कापा..त्यात ड्रग्ज असू शकतं!
Mumbai  -  

घरात भाज्यांसाठी लागणारा कांदा आणि मिरच्या चिरताना जर ड्रग्जची पाकिटे आढळली, तर आश्चर्यचकित होऊ नका! कारण तशी शक्कलच डग्ज तस्करांनी लढवली आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी हे तस्कर नेहमी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. पण आता त्यांनी चक्क कांदा आणि मिरच्यांमध्येच ड्रग्ज लपवण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे.

अशा प्रकारच्या ड्रग्ज तस्करीचा एक व्हिडियोही व्हायरल होत आहे. ज्यामुळे तपास यंत्रणांची झोप उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये अंमली पदार्थांच्या पुड्या कांदा आणि मिरचीमध्ये लपवण्यात आल्याचे दिसत आहे. मिरचीमध्ये पाच ते दहा ग्रॅमची पुडी तर, कांद्यात त्याच्या आकारमानानुसार 30 ते 40 ग्रॅमच्या पुड्या लपवण्यात आल्याचे दिसत आहे.


याआधी देखील असे प्रकार समोर आले असून काही दिवसांपूर्वी अक्रोडमध्ये लपवण्यात आलेले ड्रग्ज पकडले होते. शोध घेतले असता तस्करांनी अक्रोड तोडून त्यात अंमली पदार्थांच्या पुड्या घातल्या आणि त्यानंतर पुन्हा अक्रोड चिकटवून बंद केले होते. पुढील तपासासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या संपर्कात आहोत.

संजय झा, झोनल डायरेक्टर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोहेही वाचा -

हे ड्रग्ज तुमची मुलंही घेत असतील!

नोटबंदीनं ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले


Loading Comments