चोरट्याकडे सापडले 235 मोबाईल!

 Borivali
चोरट्याकडे सापडले 235 मोबाईल!

बोरिवलीतल्या कस्तुरबा मार्गावर असलेल्या मोबाईलच्या दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडून 235 मोबाईल जप्त केले आहेत. या सर्व मोबाईलची एकूण किंमत 52 लाख 56 हजार 690 रुपयांच्या घरात आहे. आरोपीचे नावे अब्दुल सत्तार मोटू शेख असे असून त्याला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


अशी केली चोरी

बोरीवली (पू.) येथील कस्तुरबा मार्गावरील डीएन माने या चाळीत हरिओम नवाचे मोबाईलचे दुकान आहे. 28 जूनच्या रात्री तीन चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे छत तोडून चोरी केली. दुकानावरील 9 इंचाचं छत तोडून चोर आत शिरले आणि 5 लाखांची रोकड आणि 73 लाखांचे मोबाईल घेऊन पळ काढला. दुसऱ्या दिवशी दुकानमालक जेव्हा दुकानात आले, तेव्हा सर्व सामान अस्ताव्यस्त होते आणि सर्व मोबाईल गायब होते. हे पाहून दुकानमालकाने तक्रार केली असता घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्या आधारावर चोरांचा शोध सुरू केला.परिमंडळ 12 चे पोलिस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरलेले मोबाईल ते विकू शकत नव्हते. त्यामुळे ते मोबाईल मुंबईच्या बाहेर घेऊन जाण्याच्या तयारीत होते. याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश रावराणे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अब्दुल सत्तार शेखला पकडले आणि त्याच्याकडून 235 मोबाईल जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असता 13 जुलैपर्यंत पोलिसकोठडीची शिक्षा सुनावण्यात आली. पोलिस सध्या इतर आरोपींच्या शोधात आहेत.
हे देखील वाचा - 

प्रवाशांचे चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाले

बोरिवलीतून मोबाईल चोराला अटक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments