आर्थिक नुकसानीतून व्यापाऱ्याने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

मागील अनेक दिवसांपासून शेअर मार्केट वारंवार कोसळतं असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे ते मागील अनेक दिवसांपासून ते मानसिक तणावात होते.

आर्थिक नुकसानीतून व्यापाऱ्याने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
SHARES

मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीतून पत्नीची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकिस आली. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिग्नेश दोशी, काश्मिरा दोशी अशी मृतांची नावे असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकिय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकणी अपमृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे.

हेही वाचाः- मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, पंतप्रधान मोदींनाच पत्र

शेअर मार्केटमध्ये जिग्नेश दोषी हे पैसे गुंतवायचे. मात्र मागील अनेक दिवसांपासून शेअर मार्केट वारंवार कोसळतं असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या  घटनेमुळे ते मागील अनेक दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. याच नैराक्षेतून त्यांनी बुधवारी त्यांची पत्नी काश्मिरा यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत: बेडरूमच्या बाथरूममध्ये गेले. हाताच्या दोन्ही नसा त्यांनी कापल्या आणि गळफास घेऊन आयुष्य संपले. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली. ती त्यांच्या मुलाला घरात मिळाली असून त्यात मागे विशेष कोणतीही संपत्ती ठेऊन जात नसल्यामुळे मुलाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार ठेऊ नये, असेही या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.  बुधवारी दोशी यांचा १७ वर्षीय मुलगा पार्थ घरी आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. कांदिवली येथील महावीरनगरमधील सुनीता अपार्टमेंट्च्या नवव्या मजल्यावर दोशी यांचा दोन बेडरुमचा फ्लॅट आहे. पार्थ घरात शिरल्यानंतर त्याने पालकांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला असता त्याची आई काश्मिरा या पलंगावर पडल्या होती. जवळ गेला असता ती श्वास घेत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी त्याचे वडील तेथे उपस्थित नव्हते. त्यावेळी बेडरूममधील बाथरूम आतून बंद असल्याचे त्याचा लक्षात आले. त्याने वडीलांना हाक मारली असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शंकेची पाल चुकचुकल्यामुळे त्याने बाथरूमचा प्लास्टीकचा दरवाजा तोडला. त्यावेळी वडिलांनी आत्महत्या केल्याचे त्याच्या लक्षात आले. वडिलांनी दोनही मनगटाच्या नसा कापल्या होत्या व गळफास घेतला होता. त्यानंतर मुलाने हा सर्व प्रकार शेजा-यांना सांगितला. त्यांनी दोशी यांच्या बहिणीला दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला व पोलिसांनाही कळवले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचाः- ‘ही’ केंद्राची जबाबदारी, जीएसटी परिषदेत अजित पवार आक्रमक

प्राथमिक तपासात दोशी यांनी पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे दोशी यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुसाईड नोटमध्येही मागे काही ठेऊन जात नसल्याबद्दल माफी मागितली आहे. इंग्रजीत लिहिण्यात आलेल्या या सुसाईड नोटमध्ये कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमुद करण्यात आले आहे. मुलाला मानसिक धक्का बसल्यामुळे त्याचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोनही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे प्रथम कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सध्या तरी आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही पोलिस इतर सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा