सीबीआय गुरुवारी घेणार सुशांतच्या घराची झडती

सीबीआयकडे तपास गेला तर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण यापुर्वी अनेक महत्वाचा तपास सीबीआयकडे गेला आहे, मात्र पुढे त्याचे काय झाले ? सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्या अनेक गुन्ह्याचा तपास अजून प्रलंबित आहे.

सीबीआय गुरुवारी घेणार सुशांतच्या घराची झडती
SHARES

बॉलिवुड अभिनेता सुशांतसिग आत्महत्येचा तपास सुप्रीम कोर्टाने अखेर  केंद्रीय अन्वेषण विभाग(सीबीआय)कडे सोपवला. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिस तोंडघशी पडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. तर दुसरीकडे सीबीआयकडे तपास गेला तर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण यापुर्वी अनेक महत्वाचा तपास सीबीआयकडे गेला आहे, मात्र पुढे त्याचे काय झाले ? सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्या अनेक गुन्ह्याचा तपास अजून प्रलंबित आहे. या निर्णयाचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई पोलिस आयुक्तांनी दिली आहे. 

हेही वाचाः- Mumbai Rains : गणेशोत्सवावर वादळी पावसाचं संकट, मुंबई-ठाण्यात अलर्ट

सुशांतसिंग आत्महत्येचा तपास उत्कृष्ट पद्धतीने सुरु असतानाच, बिहार पोलिसांकडुन सातत्याने मुंबई पोलिसांना टार्गेट करण्यास सुरुवात झाली होती. तसेच यामध्ये राजकीय पक्षांनी देखील सक्रीय सहभाग घेतला होता.यामुळे याचा परिणाम सुशांतसिंग आत्महत्येवर पडण्यास सुरुवात झाली होती. त्यातच बिहार पोलिसानी सुशांतच्या वडीलांच्या तक्रारीवरुन रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर बिहारचे पोलीस तपासासाठी मुंबईत आले होते. मात्र येथे येताच पालिकेने त्यांना क्वारंटाईन केले. नेमके याच कारणावरुन मुंबई पालिसांवर बिहार  पोलीस आणि तेथील सत्ताधा-यांकडून लक्ष्य करण्यात येऊ लागले. त्यातच हा तपास सीबीआयकडे देण्याची विनंती बिहार सरकारने केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकत हा तपास सीबीआयकडे दिला. यामुळे राज्यात सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठ्या प्रमाणात नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रश्न हा आहे की सीबीआयकडे तपास गेला तर पुढे काय ? कारण यापुर्वी अनेक महत्वाचे तपास सीबीआयकडे सोपविण्यात आले असले, तरी त्याचा मुळ तपास मुंबई पोलिसांनी केला होता. त्यामुळेच सीबीआयच्या तपासाला पुढे दिशा मिळाली. बहुतांश प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसाच्या दिशेनेच सीबीआयने तपास केला आहे. यामुळे याप्रकरणात सीबीआय तपासात नेमक्या कोणत्या नव्या बाबी पुढे येतात, ते महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ११३२ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू

सीबीआयकडे असलेल्या महत्वाच्या तपासाचे काय ?

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास देखील मुंबई पोलिसांनी करण्यास सुरुवात केली होती. मात्र हा तपास सीबीआयकडे जातच, सीबीआयने पिटर मुखर्जीला अटक केल्यानंतर पुढे नेमका काय तपास केला, हा प्रश्न समोर आला आहे. तर दुसरीकडे आदर्श गृहनिर्माण सोसायटीचा देखील तपास करणा-या सीबीआयने नेमका तपास काय केला ? हे अद्याप समोर आले नाही. तसेच अंधश्रद्धा निर्मलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास देखील सीबीआयकड़े आहे. मात्र अद्याप प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप सीबीआयच्या हाती लागला नाही. त्यांचा बहुतांश तपास हा कर्नाटक पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) केलेल्या तपासावर अवलंबून आले.  तसेच 1993 साखळी बॉम्बस्फोटाचा तपास मुंबई पोलिसानी अहोरात्र एक करीत, यातील सर्व आरोपीना अटक केली. मात्र त्यातुनही हा तपास शेवटच्या टप्प्यात सीबीआयकडे दिला. मात्र्ा त्यांनी तपास नेमका काय केला ? हे  अद्याप समजले नाही. यामुळे सुशांतच्या तपासाला तरी सीबीआय न्याय देईल का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचाः- मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण

सीबीआय गुरुवारी सुशांतच्या घराची घेणार झडती

 सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे येताच, सीबीआयने मुंबई पोलिसांना एक पत्र दिले असुन, सुशांत बाबतचे जे पुरावे आहेत, ते देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे एक पथक मुंबईत येत, सुशांतच्या घराची झडती घेत, याचा तपास करणार आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा