Advertisement

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकीटाचे लोकार्पण


श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकीटाचे लोकार्पण
SHARES

भारतीय डाक विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. या तिकीटाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ‘माय स्टॅम्प’ योजनेत भक्तांना अापलं तिकिट बाप्पाबरोबर छापून मिळणार अाहे.


तिकीट शुभवार्ता अाणेल

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,  श्री. सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मी श्री सिद्धिविनायक चरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे. श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत राहील. हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कसं आहे तिकीट 

या तिकिट योजनेत भक्तांना आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा, नातेवाईक यांचा फोटो श्री सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकीटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करुन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या लोकार्पण समारंभप्रसंगी  सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अादेश बांदेकर, खासदार राहुल शेवाळे, रश्मी ठाकरे अादी उपस्थित होते.



हेही वाचा-

धोतर, उपरण्यातल्या बाप्पांचा ट्रेंड

यंदा लालबागच्या राजा विराजमान होणार प्रभावळविना




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा