• बाजारात डिझायनर रांगोळीची क्रेझ! तुम्ही ट्राय केलीत का?
  • बाजारात डिझायनर रांगोळीची क्रेझ! तुम्ही ट्राय केलीत का?
SHARE

कोणताही सण हा रांगोळी काढल्याशिवाय पारच पडत नाही. पूर्वी ग्रामीण भागात गाईच्या शेणाने सडा घालून महिला तुळशी वृंदावन आणि दारासमोर दररोज रांगोळी काढत. पण आता ग्रामीण संस्कृती देखील काळाच्या ओघात लोप पावत चालली आहे. शहरांची तर काही बातच और आहे! पूर्वी शहरातल्या गृहिणी किमान दिवाळीत गेरू लावून त्यावर उपलब्ध असलेल्या जागेत ठिपक्या किंवा संस्कार भारतीची लहानशी रांगोळी काढून संस्कृती जपताना दिसून यायच्या. परंतु, शहरात वाढत्या तांत्रिक बाबींत गुंतल्यामुळे गृहिणींना रांगोळीसारखे सोपस्कार करायला तितकासा वेळही नसतो. अशा बिझी असलेल्या महिलांकरता तयार डिझायनर रांगोळ्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.आकर्षक आणि डिझायनर रांगोळ्यांची चलती

आकर्षक आणि डिझायनर रांगोळ्या बाजारपेठेत हल्ली 50 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहेत. त्यामध्ये अगदी ताटाभोवती, उंबरठ्यावर, दारासमोर काढली जाणारी रांगोळी सहज उपलब्ध आहे. विविध रंगसंगती आणि डिझाईन या रांगोळ्यांमध्ये पहायला मिळतात. गेल्या 2 वर्षांत सुशोभिकरणाच्या वस्तूंसोबतच या डिझायनर रांगोळ्यांना देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या रांगोळ्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक सेट खरेदी केल्यानंतर त्याची रचना किमान 2 पद्धतीच्या डिझाईनमध्ये करता येते. याचबरोबर या रांगोळ्या वापरून झाल्यानंतर व्यवस्थित ठेवल्या, तर त्या पुढच्या सणालादेखील वापरता येतात.'महिलांसाठी तर ही एक रोजगार संधी'

दिवाळीदरम्यान विशेष पणत्यांची रचना असलेल्या रांगोळ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या दिसून येतात. अशा रांगोळ्यांमध्ये मोर, कमळ, विविध फुले, कोयरी, स्वस्तिक अशा विविध डिझाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे घरगुती विणकाम आणि सुशोभिकरणाच्या वस्तू तयार करणाऱ्या महिलांसाठी ही एक रोजगार संधी निर्माण झाली आहे. अशा रांगोळ्या फक्त नेहमीच्या बाजारपेठेतच नव्हे, तर महाराष्ट्र व्यापारी पेठ, मोहाडिकर यांची प्रदर्शने आणि दिवाळीदरम्यान लागणाऱ्या सर्वच प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळतात.

मी 7 वर्ष जॉब केला, पण या व्यवसायात सध्या खूश आहे. माझा मार्केटिंगचा अनुभव वापरून हा बिझनेस वाढवण्याचा मी प्रयत्न करत आहे. या रांगोळ्यांच्या किंमती 50 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहेत. व्यवसाय, नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळेच या रांगोळ्यांचे महत्व वाढले आहे.

हर्षदा जोशी, व्यावसायिक


माझे स्वतःचे ब्युटी पार्लर आहे. दिवाळीचे 5 दिवस रांगोळी काढणे शक्य होत नाही. दिवाळीच्या निमित्ताने तयार रांगोळीचा सेट घेते. गेल्या 3 वर्षांत मी असे 4 रांगोळी सेट घेतले आहेत. त्यामुळे मी ते बदलून बदलून लावते आणि बाजूने पणत्या ठेवते.

वर्षा पाटील, व्यावसायिकहेही वाचा -

दिवाळी स्पेशल करायचीये? मग लोकरीचे कंदील लावा!

कुर्ल्यात साकारली 15 हजार चौरस फुटांची रांगोळी


संबंधित विषय
ताज्या बातम्या