Advertisement

अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी


अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी
SHARES

अकरावी प्रवेशाच्या दहापेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांकरीता अजून एका विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून चौथी आणि अखेरच्या फेरीचं वेळापत्रक नुकतचं शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे.


कधी सुरूवात?

सोमवारी ८ ऑक्टोबरपासून या फेरीला सुरूवात होणार असून ३० ऑक्टोबरपर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार असून यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचं जाहीर करण्यात येईल, असं आवाहनही उपसंचालक कार्यलयाकडून करण्यात आलं आहे.


कुणाचा सहभाग?

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सर्वसाधारण फेऱ्यानंतर ३ विशेष फेऱ्या पार पडल्या आहेत. आतापर्यंत दहाहून अधिक फेऱ्या झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना काही ना काही कारणास्तव प्रवेश मिळालेला नाही. त्यानुसार या फेरीत आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, एटीकेटी असलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, नव्यानं नोंदणी करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.


अत्यल्प जागा

या फेरीत विद्यार्थी आधीचे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार आहेत. मात्र या फेरीसाठी कॉलेजांमधील रिक्त जागांची स्थिती अत्यंत अल्प असल्यानं विद्यार्थ्यांनी याचा विचार करून मग अर्जाची प्रक्रिया करावी, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केली आहे.


प्रवेश फेरीचं वेळापत्रक

  • ८ ऑक्टोबर – सकाळी ११ वाजता - रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार
  • ८ ते ९ ऑक्टोबर - सकाळी ११ ते ५ - १) यापूर्वीचे प्रवेश रद्द करणे
  • संध्याकाळी ५ वाजेपर्यंत - २) काॅलेजांनी शिल्लक अल्पसंख्यांक , इनहाऊस , व्यवस्थापन जागा समर्पित करणे
  • ९ ऑक्टोबर- रात्री ८ वाजता - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करणे
  • १० ते १९ ऑक्टोबर - सकाळी ११ ते ५ पर्यंत - नवीन अर्ज सादर करणे, अपूर्ण अर्ज अप्रूव्ह करणे,
  • १० ते १९ ऑक्टोबर - सकाळी ११ ते ५ पर्यंत - प्राधान्य फेरी ४ मध्ये सहभागी होऊन, ऑनलाईन क्लिक करून काॅलेजांत जाऊन प्रवेश अपडेट करणे
  • १७ ते २० ऑक्टोबर - सामान्य शाखेतील इच्छुक विद्यार्थी बायफोकलमध्ये ट्रान्स्फर करून घेणेहेही वाचा-

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी, आजपासून सुरु होणार आणखी एक विशेष फेरीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा