Advertisement

खूशखबर...एफवायच्या ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी!


खूशखबर...एफवायच्या ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी!
SHARES

एफवायच्या प्रवेशाच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या, तरी अजूनही बरेचसे विद्यार्थी प्रवेशापासून वंचितच आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने 4 जुलैला पुन्हा संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संकेतस्थळावर जागा उपलब्ध असणाऱ्या कॉलेजची यादी जाहीर करण्यात येणार आहे. याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

नामांकित कॉलेजचा कट ऑफ 80 टक्क्यांच्या खाली आला नसल्यामुळे विद्यापीठातर्फे पुन्हा प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 4 जुलैला ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी 90 टक्क्यांहून अधिक टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिसरी यादी लागूनही अनेकांना प्रवेश मिळालेला नाही.

मुंबई विद्यापीठाच्या तीन याद्या आत्तापर्यंत कॉलेजने जाहीर केल्या. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी केलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाच नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.


मला 12 वीला 70 टक्के मिळाले, मात्र तरीही ऑनलाईन नोंदणी केलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे खूप टेन्शन होते. हे वर्ष वाया जाईल असं वाटत होतं, मात्र विद्यापीठाच्या या निर्णयामुळे कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे माझे वर्ष वाया जाणार नाही.


- वैष्णवी सावंत, विद्यार्थिनीहे देखील वाचा - 

नो टेन्शन! एफवायच्या अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा