Advertisement

अंजलीसाठी सई ताम्हणकरने वाढवलं १० किलो वजन!

सई ताम्हणकर आता लवकरच तबरेज नुरानी दिग्दर्शित ‘लव सोनिया’ या इंडो-वेस्टर्न सिनेमामध्ये झळकणार आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसोबत समरसून जाऊन चित्रपटाला योग्य न्याय देणाऱ्या सईने सिनेमासाठीही भरपूर मेहनत घेत तब्बल १० किलो वजन वाढवलं आहे.

अंजलीसाठी सई ताम्हणकरने वाढवलं १० किलो वजन!
SHARES

‘ब्लॅक एन्ड व्हाइट’, ‘गजनी’ आणि ‘हंटर’ अशा बॉलिवूडपटांमधून दिसलेली सई ताम्हणकर आता लवकरच तबरेज नुरानी दिग्दर्शित ‘लव सोनिया’ या इंडो-वेस्टर्न सिनेमामध्ये झळकणार आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसोबत समरसून जाऊन चित्रपटाला योग्य न्याय देणाऱ्या सईने सिनेमासाठीही भरपूर मेहनत घेत तब्बल १० किलो वजन वाढवलं आहे.

‘लव सोनिया’ या सिनेमात सईने अंजली नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. अंजली वेश्या व्यवसायातली दलाल असते. अशा व्यक्तीची भूमिका करताना सईला खूप तयारी करावी लागली.


काय म्हणाली सई?

आजपर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा अंजली खूपच वेगळी आहे. अशा महिलांना मी कधीही भेटलेही नाही. त्यांची देहबोली आत्मसात करताना काही निरीक्षणं आणि बारकाईने संशोधन केलं.

या भूमिकेसाठी मला साडी नेसायची होती. या व्यवसायात असलेल्या स्त्रिया जेव्हा साडी नेसतात, तेव्हा त्यांच्या पोटाकडचा आणि पाठीकडचा भाग उघडा असतो. ब्लाउज बऱ्याचदा व्यवस्थित फिटिंगचे नसतात. त्यातून त्यांची जागरणं किंवा अवेळी जेवणानं वाढलेलं वजन प्रकर्षानं दिसून येत असतं, हे उमगलं आणि त्यांच्याप्रमाणे भूमिका साकारण्यासाठी मेहनत घेतली.


'यावर' केलं लक्ष केंद्रित

या सिनेमातील आपल्या भूमिकेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगत सई म्हणाली, कॉस्च्युम डिझाइनर शाहिद आमिर यांनी ब्लाउज डिझाइन करताना ते मुद्दामहून मापाचे नसतील किंवा ते पाठीकडच्या भागातून थोडे वर जातील असेच डिझाइन केले होते. आता मला माझं वजन वाढवणं गरजेचं होतं. वेट गेन करताना सुटलेलं शरीर दिसणं आणि आकारमानं बेढब असणं यावर लक्ष केंद्रित केलं. ‘लव सोनिया’साठी मी जवळ-जवळ १० किलो वजन वाढवलं होतं.


हेही वाचा -

रसिका आणि आदितीचा ‘यू अँड मी’

सायबर गुन्ह्यांचा छडा लावणार महेश मांजरेकर!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा