Advertisement

१०० वर्ष जुनं झाड वाचवायला प्राध्यापकाची धडपड, मुंबईत मोजकीच झाडे शिल्लक!

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीवरून पर्यावरणप्रेमी विरूद्ध मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) वाद सुरूच आहे. असे असताना आता सेंट झेवियर्समधील एका प्राध्यापकाने झाडांच्या कत्तलीविरोधात दंड झोपटले आहेत, तेही एका दुर्मिळ झाडाला वाचवण्यासाठी!

१०० वर्ष जुनं झाड वाचवायला प्राध्यापकाची धडपड, मुंबईत मोजकीच झाडे शिल्लक!
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीवरून पर्यावरणप्रेमी विरूद्ध मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) वाद सुरूच आहे. असे असताना आता सेंट झेवियर्समधील एका प्राध्यापकाने झाडांच्या कत्तलीविरोधात दंड थोपटले आहेत, तेही एका दुर्मिळ झाडाला वाचवण्यासाठी!


कामा हॉस्पीटलजवळ १०० वर्ष जुनं झाड

कामा हॉस्पिटलजवळ मेट्रो-३ मधील एक मेट्रो स्थानक येणार आहे. या मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार येणाऱ्या फुटपाथवर एक पिंपळासारखे दिसणारे १०० वर्षांहून जुने असे झाड आहे. हे झाड जरी पिंपळासारखे दिसत असले, तरी मुळात हे झाड पिंपळाचे नाही. या झाडाचे नाव आहे फायकस व्हायरन्स. मराठीत या झाडाला नेमके काय म्हणतात याची माहिती उपलब्ध नाही. पण हे झाड पिंपळ, वड आणि उंबर या जातीतले आहे.


मोजकेच फायकस व्हायरन्स शिल्लक

मुंबईत हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच फायकस व्हायरन्स झाडे शिल्लक असून ही झाडे जगवणे पर्यावरणाच्या आणि वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. असे असताना मेट्रो-३ च्या कामासाठी या दुर्मिळ झाडाची कत्तल एमएमआरसीकडून करण्यात येणार आहे. या झाडावर तशी नोटीसही लावण्यात आली आहे. अत्यंत दुर्मिळ असे हे झाड कापण्यात येणार असल्याचे सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक राजेंद्र शिंदे यांना समजले आणि त्यांना धक्काच बसला. त्यानंतर मात्र त्यांनी हे झाड वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
वृक्ष प्राधिकरणानेही दिली मंजुरी

हे झाड अत्यंत दुर्मिळ असल्याने हे झाड वाचवावे असे पत्र नुकतेच एमएमआरसीला पाठवल्याची माहिती शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे एमएमआरसीच्या झाडांच्या यादीत हे झाड पिंपळाचे दाखवण्यात आले आहे. तर या झाडाच्या कत्तलीसाठी वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे शिंदे याची चिंता वाढली असून त्यांनी आता हे झाड वाचवण्यासाठी एमएमआरसीकडे पाठपुरावा सुरू केला आहे.


'...तर मी न्यायालयात जाईन'!

दरम्यान, शिंदे यांच्या पत्रानंतर एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेत 'हे झाड कापण्यात येणार नसल्याचे' स्पष्ट केले आहे. मात्र, कागदोपत्री हे झाड कापले जाणार नाही, असे काहीही दिसत नसल्याने शिंदे यांनी 'एमएमआरसीने यासंबंधीची लेखी हमी द्यावी' अशी मागणी केली आहे. तर हे झाड कापण्याचा निर्णय एमएमआरसीने मागे घेतला नाही, तर या एका झाडासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याची आपली तयारी असल्याचे 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केले आहे.हेही वाचा

नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा