Advertisement

लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की: पोलिस करणार कार्यकर्त्यांची चौकशी

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला विरूद्ध दिशेने आत आणण्याचा प्रयत्न मंगळवारी एका कार्यकर्त्याने केला. राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेतून त्यांना थेट नवसाच्या रांगेत घुसवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी नवसाच्या रांगेत घुसू पाहणाऱ्यांना रोखलं. तिथून पुढे वाद सुरू झाला.

लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की: पोलिस करणार कार्यकर्त्यांची चौकशी
SHARES

लालबागच्या राजाच्या दरबारात कार्यरत असलेल्या मुजोर कार्यकर्त्यांभोवती आता पोलिसांनी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. कारण मंगळवारी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.


कशी झाली धक्काबुक्की?

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला विरूद्ध दिशेने आत आणण्याचा प्रयत्न मंगळवारी एका कार्यकर्त्याने केला. राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेतून त्यांना थेट नवसाच्या रांगेत घुसवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी नवसाच्या रांगेत घुसू पाहणाऱ्यांना रोखलं.


वाद चिघळला

त्यावरून एका कार्यकर्त्याने त्यांना ओळखीच्या व्यक्तींना आत सोडण्याचा आग्रह केला. पण भाविकांची गर्दी लक्षात घेता कुमार यांनी ते शक्य नसल्याचं सांगिल्याने कार्यकर्ते कुमार यांच्याशी वाद घालू लागले. हा वाद इतका चिघळला की कार्यकर्ते पोलिसांना थेट धक्काबुक्की करू लागले. त्यावेळी पोलिसांनी संबधित कार्यकर्त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता. इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


याआधीही धक्काबुक्की

राजाच्या दरबारात कार्यकर्त्यांच्या मुजोरीचीही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी अशाच काही कारणांवरून कार्यकर्ते आणि पोलिस एकमेकांना भिडले आहेत. मागील वर्षी एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुकीचा प्रकार घडला होता.


चौकशीचे आदेश

त्यातच मंगळवारी कार्यकर्त्यांनी थेट पोलिस उपायुक्तांनाच धक्काबुक्की केल्याने हे प्रकरण प्रशासनाने गंभीरपणे घेतलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या चौक‍शीच्या अहवालातून दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.



हेही वाचा-

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाहीच! - हायकोर्ट

लालबागचा राजाच्या दरबारात पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये जुंपली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा