Advertisement

खबरदार! बाप्पा झाले पोलिस!


खबरदार! बाप्पा झाले पोलिस!
SHARES

गणेशोत्सवादरम्यान बाप्पाची वेगवेगळी रुपे आपण बघितली असतीलच. पण खारच्या एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्या घरी बाप्पाची चक्क पोलिस अवतारातली मूर्ती स्थापित केली आहे. ही मूर्ती जरी सगळ्यांचे आकर्षण ठरत असली, तरी त्यातून जनजागृती करण्याचा या अधिकाऱ्याचा उद्देश आहे.



खार पोलिस ठाण्यात असलेले पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी त्यांच्या अंधेरी येथील घरात पोलिस वेशातील बाप्पांची मूर्ती आणि देखावा साकारला आहे. येथे ठाणे अंमलदार कक्षात खाकीत उभे असलेले गणपती बाप्पा तुम्हाला दिसतील. ज्यांच्या कंबरेला पिस्तुल देखील लावली आहे. विशेष म्हणजे बाप्पाच्या युनिफॉर्मवर नावाच्या पाटीवर चक्क श्री गणेश असा उल्लेख केला आहे. बाप्पांचा देखावा हा देखील खाकी वेशातील बाप्पांना साजेसा असाच म्हणजे पोलिस स्थानकाचा आहे. इथे ठाणे अंमलदार कक्षात उभे असलेले बाप्पा तुम्हाला जनजागृती करताना दिसून येतील. बाप्पांच्या पाठीमागे बनवण्यात आलेला लॉकअप (पोलिस कोठडी) गुन्हेगारांच्या काळजाचा ठोका चुकवेल हे नक्की!



आमच्या कुटुंबात माझे वडील, भाऊ यांच्यासह बरेच जण पोलिसात आहेत. मी पाचवीत असताना आमच्या शिकवणीच्या शिक्षकांनी शिक्षकांच्या वेशातील मूर्ती बसवली होती. तेव्हापासून मला पोलिसांच्या वेशातील बाप्पाची मूर्ती बसवण्याची इच्छा होती.

राजेंद्र काणे, पोलिस निरीक्षक 

गणेशोत्सवानिमित्त अंमली पदार्थ, सायबर गुन्हे तसेच ट्रॅफिकच्या समस्यांवर काही चित्रफिती बनवल्या असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या एलईडी स्क्रीन लावून त्या दाखवणार असल्याचे काणे पुढे म्हणाले.

गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिस खात्यात असलेले आणि सध्या खार पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र काणे यांना नेहमीच पोलिस वेशात आलेल्या बाप्पाची मूर्ती घरी बसवण्याची इच्छा होती. पण अशी मूर्ती साकारणारा मूर्तिकार सापडत नव्हता. शेवटी यावर्षी योग आला आणि विलेपार्लेतील एक मूर्तिकार तयार झाला. त्यातून त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले.



हेही वाचा - 

अजूनही तिथे 125 वर्षांपूर्वीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा होतो!

ही मंडळं ठरणार गणेशोत्सवात प्रमुख आकर्षण!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा