Advertisement

बाप्पाच्या विसर्जनासाठी दक्षिण मुंबईत ५ कृत्रिम तलाव


बाप्पाच्या विसर्जनासाठी दक्षिण मुंबईत ५ कृत्रिम तलाव
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच सणांवर संकट आलं आहे. यंदाच्या गणेशोस्तवावर ही कोरोनाच सावट आहे. गणेशोस्तव दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. तसंच, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने गणेश विसर्जनासाठी दक्षिण मुंबईमध्ये ५ ठिकाणी अतिरिक्त कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दक्षिण मुंबईतील ग्रॅन्टरोड, ताडदेव, मलबार हिल, मुंबई सेंट्रल आणि गिरगाव या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं या परिसरातील नागरिकांना गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जाण्याची गरज भासणार नाही. कोरोनामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई केली आहे. 

गत वर्षी महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी मुंबईत ३४ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले होते. मात्र, ही संख्या अपुरी असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराजवळच गणेश विसर्जन करता यावं यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. 

या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाच ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

तलावांची ठिकाण

  • 'डी' विभाग कार्यालयाच्या हद्दीतील ऑगस्ट क्रांती मार्गावरील ऑगस्ट क्रांती मैदान
  • ताडदेवच्या साने गुरुजी मार्गावरील वसंतदादा पाटील उद्यान (वाहतूक बेट)
  • मलबार हिल येथील डोंगरशी मार्गावरील एस. एम. जोशी क्रीडांगण
  • डॉ. दादासाहेब भडकम मार्गावरील गिल्डर लेन कर्मचारी वसाहत
  • गिरगावमधील विठ्ठलभाई पटेल रोडवरील आंग्रेवाडीतील मोकळा भूखंड
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement