दिवाळीत भेट द्यायची मुंबईतली 5 सर्वोत्तम ठिकाणं!

दिवाळीच्या सुट्टीत या ठिकाणी नक्की भेट द्या..दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना कंटाळा येतो. अशावेळी मुंबईतील या ठिकाणांना भेट द्या.

SHARE

दिवाळीची सुट्टी लागली की सगळ्यात जास्त टेन्श्न येतं ते पालकांना.. सुट्टीत मुलांनी घातलेला धुडगूस पालकांना अक्षरश: नकोसा होतो. पालकांच्या त्रासात आणखी भर पडते ती फराळ करताना.. फराळ करताना हमखास ही मुलं मध्ये-मध्ये येतात. त्यामुळे दिवाळीची सुट्टी नको बाई! अशी अवस्था पालकांची होते. त्यानंतर दिवाळी तर संपली, आता आम्ही काय करू, कंटाळा आला अशी भूणभूण मुलं पालकांमागे लावतात. त्यामुळे वैतागलेल्या पालकांना मुलांचा वेळ कसा घालवायचा हेच कळत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला मुंबईतील असी काही मोजकी ठिकाणं सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मुलांना दिवळीच्या सुट्टीत नेऊ शकता. यामुळे मुलांचा वेळ ही जाईल आणि दिवाळीचा सुट्टीही सत्कारणी लागेल! 1) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच 'नॅशनल पाार्क' असंही म्हणतात. १०४ चौ. कि. मी. परिसरात हे जंगल पसरलेलं आहे. वाघ, सिंह, चित्ता, सांबर, माकड, साप यांसारखे वन्य प्राणी इथे बघायला मिळतात. लहान मुलांचं आकर्षण म्हणजे उद्यानात सुरू करण्यात आलेली वनराणी मिनी ट्रेन! त्याचबरोबर उद्यानात जैन धर्मीयांचं प्रार्थनास्थळ प्रसिद्ध आहे. जे त्रिमूर्ती या नावानं ओळखलं जातं. उद्यानातलं आणखी एक आकर्षण म्हणजे कान्हेरी लेणी. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक दिवस तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला नक्की भेट द्या.2) मत्स्यालय

मुंबईतील तारापोरवाला हे मत्स्यालय तुम्ही बघितलं नसेल, तर या दिवाळीच्या सुट्टीत नक्की प्लॅन करा. १९५१ साली मरीन ड्राईव्हसमोर लोकांना समुद्राच्या आतील जग बघता यावं, यासाठी हे मत्स्यालय सुरू करण्यात आलं. मत्स्यालयात एकदा प्रवेश केलात की तुमचा दिवस कसा निघून जातो हे कळतच नाही. मत्स्यालयात असलेले १०० हून अधिक मासे, ७२हून अधिक माशांच्या प्रजाती बघताना लहान मुलं हरखून जातात! प्रत्येक टॅन्कवर त्या त्या माश्याबद्दल थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. त्यामुळे लहान मुलांना मनोरंजनाबरोबरच सागरी जीवांबद्दल माहितीही कळते.3) डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम

तुम्हाला जर मुंबईचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर तुम्ही नक्की डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियमला भेट द्या. १८३२ साली हे म्युझियम बांधण्यात आलं. मुंबईच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू, ग्रंथ या संग्राहलयात आहेत. या म्युझियममध्ये चित्रकलेचं दालन, मानवी आकृत्यांमध्ये जुन्या मुंंबईचं चित्र उभं केलं आहे.4) नेहरू तारांगण

जर तुमच्या मुलांना ग्रह-तारे याबद्दल कुतुहल असेल, तर दिवाळीच्या सुट्टीत एक दिवस नेहरू तारांगणला नक्की भेट द्या. नेहरू तारांगण म्हणजे गोलाकार थिएटर. या थिएटरमधील खुर्च्यांमध्ये निवांत झोपून अाकाशदर्शन घेता येतं. त्याचबरोबर ग्रह- ताऱ्यांची ओळखही होते. इथे मुलांसाठी आणखी एक आकर्षणाचा भाग म्हणजे विविध ताऱ्यांच्या नावाने तयार केलेले वजन काटे. या काट्यांवर उभे राहून वजन केल्यास त्या ताऱ्यांवरील तुमचे वजन किती हे समजतं. त्याचबरोबर इथे एकूण १४ कार्यशाळा आहेत. यात भारतीय कला, बौद्धिकता व विविध संस्कृतिक प्रदर्शन पाहता येते.5) किड्सझेनिया

सध्या मुलांचं फेव्हरेट ठिकाण म्हणजे किड्सझेनिया थीम पार्क! हे थीम पार्क एक स्वतंत्र देश म्हणून वसवलं आहे. त्यामुळे इथे प्रवेश करताना मुलांना बोर्डिंग पास आणि नकाशा दिला जातो. तसंच, एकदा आत प्रवेश केल्यावर मुलांना ठरवायचं असते की त्यांना काय व्हायचं आहे. फायरमॅन, बॅँकर, शेफ, कलाकार किंवा चित्रकार यातील एक पर्याय मुलांना निवडावा लागतो. इथे स्वतंत्र चलन वापरलं जातं. इथे पालक सोबत नसल्यामुळे मुलांना त्यांचे निर्णय स्वता: घ्यावे लागतात.हेही वाचा

अबब... मुंबईहून लंडन गाठायला ७२ दिवस


संबंधित विषय