Advertisement

बाप्पाच्या देखाव्यासाठी साकारली 'किल्ले रायगड'ची प्रतिकृती


बाप्पाच्या देखाव्यासाठी साकारली 'किल्ले रायगड'ची प्रतिकृती
SHARES

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणं अावश्यक अाहे. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून किल्ल्यांवर फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रभादेवी येथील भिकू इमारतीमध्ये राहणाऱ्या बिर्जे कुटुंबियांनी गणपती बाप्पाच्या देखावासाठी 'किल्ले रायगड' ची प्रतिकृती साकारली आहे. 
महाराजांच्या वेशात बाप्पा

बाप्पासाठी साकारलेला 'किल्ले रायगड'चा संपूर्ण देखावा इकोफ्रेंडली आहे. बिर्जे कुटुंबियांनी 'किल्ले रायगड'ची प्रतिकृती साकराण्यासाठी संपूर्ण घराचा वापर केला अाहे. बाप्पाची मूर्ती शिवाजी महाराजांच्या वेशात असून ही मूर्ती शाडूमातीची आहे.  


 गड-किल्ले संवर्धन समिती

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ट्रेकिंगला जाणारे शिवप्रेमी नेहमीच प्रयत्न करत असतात. काही ट्रेकर्स क्लबकडून गड-किल्ल्यांची साफसफाई केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर महाराजांची समाधी आहे. इथं जाणाऱ्या पर्यटकांना  या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व किती मोठं आहे हे समजण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.  यासाठी गड-किल्ले संवर्धन समितीदेखील नेमण्यात आली आहे.

हेही वाचा -

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाहीच! - हायकोर्ट

केकपासून साकारला बाप्पा!

मालाडचं रिद्धीविनायक गणेश मंदिर
संबंधित विषय
Advertisement