Advertisement

गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील 'हे' मार्ग असतील बंद


गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील 'हे' मार्ग असतील बंद
SHARES

गणेशोत्सवादरम्यान १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने काही मार्ग बंद ठेवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (दक्षिण वाहिनी) - भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंडपर्यंत गुरूवार सकाळी ६ वाजल्यापासून २३ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान शहरात जड वाहनांची वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्ग देण्यात आलेले नाहीत. तसंच या भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंडपर्यंतचा मार्ग गुरूवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर रोजी दररोज दुपारी ३ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

जड वाहने सोडून इतर वाहनांसाठी भारतमाता जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन करी रोड पूल, शिंगटे मास्तर चौकातून डावीकडे वळण घेऊन एन. एम जोशी मार्ग, आर्थर रोड नाका, एस ब्रिज मार्ग, डॉ. बी. ए. रोड आणि भारतमाता जंक्शनकडून डावीकडे वळण घेऊन नाईक चौक, साईबाबा पथ येथून डावीकडून वळून जी. डी. आंबेकर मार्ग, दीपक ज्योती टॉवर, श्रवण यशवंते चौक असे पर्यायी मार्ग खुले असणार आहेत.

त्याचप्रमाणे डॉ. बी. ए. रोड (दक्षिण वाहिनी ) - डॉ. बी. ए. रेड दक्षिण वाहिनीने गॅस कंपनी चौकातून साने गुरुजी मार्ग उजवीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक गुरूवारपासून सकाळी ६ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे. यासाठी गुलाबराव गणाचार्य चौकात (आर्थररोड नाका ) जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोड, भारतमाता जंक्शनकडून उजवीकडे वळून करी रोड रेल्वे पूल, शिंगटे मास्तर चौकातून डावे वळण एन. एम. जोशी मार्ग, गुलाबराव गणाचार्य चौक आणि या चौकात जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोड गॅस कंपनी जंक्शन येथून सरळ जाऊन काळाचौकी जंक्शन, बावला कंपाऊंड येथे यू टर्न घेऊन डॉ. बी. ए. रोड (उत्तर वाहिनी ) - गॅस कंपनी जंक्शनकडून डावे वळण घेऊन एन. एम, जोशी मार्ग, गुलाबराव गणाचार्य चौक असा पर्यायी मार्ग असेल.

तर चिंचपोकळी रेल्वे पुलावरून साने गुरुजी मार्गाने गॅस कंपनी जंक्शन येथे उजवीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक उद्यापासून सकाळी ६ ते २३ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गासाठी गुलाबराव गणाचार्य चौकातून पुढे एन. एम. जोशी मार्गावरून पुढे येऊन एस ब्रिज मार्ग असा पर्यायी मार्ग असेल. त्याचप्रमाणे चिंचपोकळी रेल्वे पुलावरून साने गुरुजी मागाहून सरळ डॉ. बी. ए. रोड (उत्तर वाहिनी ) भारतमाता जंक्शनवरून उजवे वळण घेऊन जी. जी. भाई लेन, साईबाबा पथ, ग. द. आंबेकर मार्ग, श्रवण यशवंते चौक, अल्बर्ट जंक्शन, तानाजी मालुसरे मार्ग, टी. बी. कदम मार्ग, बावला कंपाऊंड, डॉ. बी. ए. रोड हा मार्ग खुला असेल.

तसंच चिंचपोकळी पुलावरून येणार साने गुरुजी मार्ग (उत्तर वाहिनी ) गुरूवारपासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद करण्यास येईल. यासाठी चिंचपोकळीहून एन. एम. जोशी मार्गावरून पुढे येऊन एस ब्रिजमार्गे पर्यायी वाहतुकीसाठी रस्ता सुरु ठेवण्यात आला आहे. एस. एस. राव रोडवरील नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी हा रस्ता उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. मात्र, स्थानिकांची वाहने सोडण्यात येतील.

दत्ताराम लाड मार्ग - डॉ. बी. ए. रोडवरील सरदार हॉटेल जंक्शन ते श्रवण यशवंते चौक (दोन्ही बाजूने ) गुरूवारपासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवासी डॉ. बी. ए. रोडवरून श्रवण यशवंते चौकाकडे जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोडने बावळा कंपाऊंडकडून डावे वळण आणि टी. बी. कदम मार्गावरून उजवे वळण, तानाजी मालुसरे मार्गावरून डावे वळण घेऊन रामभाऊ भोगले मार्ग आणि श्रवण यशवंते चौकाकडे येऊ शकतात. श्रवण यशवंते चौकाकडून डॉ. बी. ए. रोडकडे येण्यासाठी अल्बर्ट सर्कल जंक्शनकडून उजवे वळण आणि तानाजी मालुसरे मार्गावरून डावे वळण घेऊन टी. बी. कदम मार्गाने डॉ. बी. ए. रोडकडे वाहने जाऊ शकतात.



हेही वाचा-

गणेशोत्सवासाठी वाहतूक पोलिस सज्ज, ५ चौपाट्यांवर नियंत्रण कक्ष

'ही' अाहेत मुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा