Advertisement

गणेशोत्सवासाठी दादरचं फूल मार्केट विविध फुलांनी सजलं

दादरच्या फूल मार्केटचं चित्रच बदललं आहे. दादर येथील फूल मार्केट विविध फुलांनी सजले आहे.

गणेशोत्सवासाठी दादरचं फूल मार्केट विविध फुलांनी सजलं
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळं मार्च महिन्यापसून बंद असलेलं दादरचं फूल मार्केट जून महिन्यात हळूहळु सुरू झालं. वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी सजलेल्या मार्केटमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी असायची. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनमुळं ग्राहकांनी फूल मार्केटकडं पाठ फिरवली. त्यामुळं यंदा सणांमध्ये फुलांना भाव चांगला मिळेल की यांची चिंता येथील फूल विक्रेत्यांना सतावत होती. परंतु, श्रावण सुरू होताच दादरच्या फूल मार्केटचं चित्रच बदललं आहे. दादर येथील फूल मार्केट विविध फुलांनी सजले आहे.

यंदा गणेशोत्सवासाठी दादर येथील फूल मार्केट विविध फुलांनी सजलं आहे. यंदा फुलांना भावही चांगला असून नागरिकही बाप्पाच्या पूजेसाठी, तसेच हार आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करत आहेत. कोरोनाच्या काळातही फुलांची विक्री होत असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईवर कोरोनाचं संकट असलं तरीही नागरिक लाडक्या बाप्पासाठी फुलं खरेदी करण्यासाठी दादर इथं गर्दी करत आहेत.

दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांची आवकही दरवर्षीप्रमाणंच झाली आहे. पुणे, सांगली, सातारा व नाशिक अशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून दादर फूल मार्केटमध्ये शेतकरी फुले घेऊन येत आहेत. दादर फूल मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी आहे.

'या' फुलांना मागणी

  • कलकत्ता गोंडा ८० ते १०० रुपये किलो 
  • पिवळा गोंडा १४० ते १६० रुपये किलो 
  • पिवळी शेवंती १६० रुपये किलो
  • जांभळी शेवंती १६० रुपये किलो
  • पांढरी शेवंती १२० रुपये किलो
  • दांडी शेवंती २८० रुपये किलो
  • गुलछडी ६० रुपये किलो
  • गुलाब पाकळ्या ६० रुपये किलो
  • लिली १० रुपये बंडल
  • गुलाब फूल ४० रुपये बंडल 
  • सूर्यफूल ६० रुपये बंडल



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा