Advertisement

लालबाग परिसरात यंदा गणेश भक्तांच्या गर्दीत वाढ


लालबाग परिसरात यंदा गणेश भक्तांच्या गर्दीत वाढ
SHARES

मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. मुंबईत १० दिवस हा उत्सव विशेष उत्साहान साजरा केला जातो. विशेष म्हणजे मुंबईतील खेतवाडी, लालबाग, चिंचपोकळी यांसारखे परिसर गणेशोत्सवासाठी संपुर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाचे १० दिवस या परिसरात गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यंदा लालबाग परिसरातील प्रसिद्ध असलेल्या मंडळांमध्ये आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. यामध्ये 'लालबागचा राजा', 'गणेशगल्ली', तेजुकाया, आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळांचा समावेश असून, या मंडळांनी वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर केले आहेत. त्यामुळं हे देखावे पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासून गणेशभक्तांनी गर्दी केली आहे. या गर्दीमुळं लालबाग परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोठ्या त्रासाला समोरं जावं लागत आहे.  

यावर्षी लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा उभारण्यात आला आहे. गणेशगल्ली येथे अयोध्येतील राम मंदिराचा देखावा, चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळानं नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. लालबागच्या या प्रसिद्ध ३ मंडळांमधील यंदाचे आकर्षक देखावे आणि तेजुकाया मंडळातील २२ फूट कागदी लगद्याची मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मुंबईसह देशभरातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी या परिसरात येत आहे.

यंदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १२०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस २४ तास आपलं काम करत आहेत. लालबागमध्ये दिवसा बाप्पाचं दर्शन घेणाऱ्या गणेश भक्तांच्या गर्दीच्या तुलनेत रात्रीच्या वेळी दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळं येथील स्थानिकांना देखील गणेशोत्सवातील १० दिवस भोंगे, पिपेऱ्या यांच्या कर्कष आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, यंदा २ सप्टेंबरला गणपती बाप्पा घरांघरांमध्ये आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान झाले. त्यावेळी मुंबईत बाप्पाच्या आगमनावेळी जोरदार पावसानंही हजेरी लावली. त्यामुळं दरवर्षी तासंतास रांगेत उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेणाऱ्या भक्तांनी यंदा अवघ्या १० मिनिटांच बाप्पाचं दर्शन घेता आले. तसंच, बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळं लालबाग परिसरातील सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. तसंच, विकेंड असल्यानं पुन्हा एकदा गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात या परिसरात गर्दी जमलेली पाहायला मिळते आहे.

या गर्दीमुळं अनेकांचे मोबाईलही चोरीला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दरवर्षी परिसरात बाप्पाचं दर्शन घ्यायला येणाऱ्या तब्बल २०० ते ३०० भक्तांचे मोबाईल चोरीला जातात. मात्र या गर्दीमुळं पोलिसांनाही या चोरांचा तपास करणं कठीण होतं. हेही वाचा - 

गणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग

गणेशोत्सव २०१९: लालबागच्या राजाचं पहिलं दर्शनसंबंधित विषय
Advertisement