Advertisement

14 की 15 जानेवारी मकर संक्रांती यंदा कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या

नवीन वर्षातला पहिलाच येणारा सण म्हणजेच मकरसंक्रांत

14 की 15 जानेवारी मकर संक्रांती यंदा कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या
SHARES

नवीन वर्षातला पहिलाच येणारा सण म्हणजेच मकरसंक्रांत (Makar Sankranti). हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खास करून महिलांना मध्ये या सणाचा खुप उत्साह असतो.

तीळ गुळ बनवले,नविन कपडे(काळे) खरेदी करणे,हळदी कुंकुचा कार्यक्रम ठेवणे,हे सर्व मकर संक्रांतीत महिला (Women) आनंदाने करतात. या सणात काळ्या कपडयांना अधिक महत्व दिले जाते.

मकरसंक्रांत हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. साधारणपणे मकर संक्रांती दरवर्षी 14 जानेवारीला साजरी केली जाते. मात्र ग्रहांच्या बदलामुळे यंदा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण १५ जानेवारीला साजरा होणार आहे.

जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत ही देशातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी ओळखली जाते. जसे उत्तरायण, पोंगल, खिचडी इ. देशभरात मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून तीळ आणि खिचडी खाण्याचे महत्त्व आहे. या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ (Food) तयार केले जातात, परंतु, विशेषतः गुळाचे तिळाचे लाडू आणि खिचडी खाणे महत्त्वाचे आहे.

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

2023 शुभ मुहूर्त

शुभ वेळ - मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी सकाळी 07:15 ते संध्याकाळी 05:46 पर्यंत.

अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:09 ते दुपारी 12:52 पर्यंत

विजय मुहूर्त - दुपारी 02:16 ते दुपारी 02:58 पर्यंत



हेही वाचा

आदर स्त्रीशक्तीचा : आदिवासींच्या प्रगतीसाठी लढणारी 'नवदुर्गा'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा