Advertisement

‘हॉटेल बिलावरील सेवाशुल्क रद्द करा’


‘हॉटेल बिलावरील सेवाशुल्क रद्द करा’
SHARES

मुंबई - हॉटेल-रेस्टॉरन्टच्या बिलावर आकारले जाणारे सेवाशुल्क त्वरीत रद्द करावे अशी मागणी देशभरातील 93 टक्के ग्राहकांची आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने 'टु पे ऑर नॉट टु पे' असे म्हणत हॉटेल-रेस्टॉरन्टच्या बिलावर आकारल्या जाणाऱ्या सेवाशुल्कासंबंधी केलेल्या नॅशनल ऑनलाइन सर्व्हेक्षणाद्वारे ही मागणी समोर आली आहे. आता ही मागणी लवकरच केंद्र सरकारकडे ठेवत हॉटेल-रेस्टॉरन्ट बिलावरील सेवाशुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पंचायतीच्या अभियान प्रमुख वर्षा राऊत यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने हॉटेल-रेस्टॉरन्टच्या बिलावर सेवाशुल्क आकारण्याची परवानगी मालकांना दिली आहे. त्याचवेळी हे सेवाशुल्क नाकारण्याचीही मुभा ग्राहकांना दिली आहे. मात्र मालक सेवाशुल्क नाकारण्याचा ग्राहकांचा अधिकार मानत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी, संभ्रम असून कायद्यातील ही विसंगती दूर करण्याची मागणी होत आहे.
या धर्तीवर पंचायतीने एक विशेष मोहीम हाती घेत हे सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार देशभरातील 48 शहरातील 2 हजार 290 ग्राहकांपैकी 2 हजार 129 ग्राहकांनी सेवाशुल्क नाकारत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. तर यातील 71 टक्के ग्राहकांनी सेवाशुल्क आकारले तर सेवाशुल्क आकारणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरन्टवर बहिष्कार टाकण्याचीही तयारी दाखवली आहे. आता हे सर्व्हेक्षण केंद्र सकारसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा