Advertisement

तुम्ही बिर्याणीचे चाहते आहात? मग ठाण्यात या फेस्टिव्हलला भेट द्या!

२३ ते २५ फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस बिर्याणीवर ताव मारता येणार आहे. फेस्टिव्हलमध्ये चिकन बिर्याणी, इटालियन बिर्याणी, मेओनीज बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, क्रॅब (खेकडा) बिर्याणी, फिश बिर्याणी, चीझ बिर्याणी अशा १५ ते २० प्रकारच्या बिर्याणी असणार आहेत.

तुम्ही बिर्याणीचे चाहते आहात? मग ठाण्यात या फेस्टिव्हलला भेट द्या!
SHARES

इटालियन बिर्याणी, मेओनीज बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अंबूर बिर्याणीचायनीझ बिर्याणी आणि लखनवी बिर्याणी... हुश्श... दम काढला या बिर्याणीनंआता मी एवढी नावं का घेतेय, असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर या सर्व बिर्याणींचा आस्वाद घेण्याची संधीच खवय्यांना मिळाली आणि खवय्यांनी देखील या संधीचं सोन केलं.



बिर्याणी म्हणजे खवय्यांचा 'वीक पॉइंट'!

मग ती व्हेज असो वा नॉनव्हेजअशाच खवय्यांसाठी ठाण्यात पहिल्यांदाच 'बिर्याणी फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं आहे२३ ते २५ फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारशनिवार आणि रविवार असे तीन दिवस बिर्याणीवर ताव मारता येणार आहे. 


'स्वराज्य इव्हेंन्टस' आणि 'टॅग' या ठाण्यातल्या विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या संस्थेच्या वतीनं बिर्याणी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहेफेस्टिव्हलमध्ये चिकन बिर्याणी, इटालियन बिर्याणी, मेओनीज बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, क्रॅब (खेकडा) बिर्याणी, फिश बिर्याणीचीझ बिर्याणी अशा ४० हून अधिक प्रकारच्या बिर्याणींचा आस्वाद घेता येणार आहे. 



फक्त बिर्याणीच नाही, तर विविध प्रकारचे स्टार्टर्स आणि कबाबचे अनेक प्रकार देखील फेस्टिव्हलमध्ये खायला मिळणार आहेत! चिकन चीझ रोल, चिकन पापलेट, कोळंबी फ्राय असे अनेक प्रकार स्टार्टस फेस्टिव्हलमध्ये आहेत. 



स्टार्टर आणि मेनकोर्सनंतर मीठा तो बनता है ना बॉसमग इतकं चटपटीत खाल्ल्यानंतर खवय्यांसाठी स्वीट डिश म्हणून फिरणी, शाही तुकडा आणि लाइव्ह आईस्क्रिम आहे.



बिर्याणीसोबत संगीताची मेजवानी

फेस्टिव्हलमध्ये बिर्याणीसोबतच संगीताची देखील मेजवानी आहे बरं काशुक्रवारशनिवार आणि रविवार असे तीन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेतलाइव्ह म्युझिक आणि शाम ए गजल मुशायरा तर फेस्टिव्हलची रंगत आणखीनच वाढवतील.



कुठे आहे फेस्टिव्हल?

ठाण्यातल्या जांभळी नाका इथल्या शिवाजी मैदानात फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात येणार आहेतर शनिवारी आणि रविवारी देखील ५ वाजल्यापासून फेस्टिव्हल रंगणार आहेअधिक माहितीसाठी तुम्ही बिर्याणी फेस्टिव्हल या फेसबुक पेजला भेट देऊ शकता.


हेही वाचा

डायबेटिस असूनही तुम्ही गोड खाऊ शकता! हे वाचा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा