स्विगीवर बिर्यानीची क्रेझ, एका मिनिटात येतात 'इतक्या' ऑर्डर

स्विगी अॅपवरून सर्वात जास्त चिकन बिर्यानी ऑर्डर केली जाते. एका मिनिटात येणाऱ्या ऑर्डरची संख्या कळली तर बसेल धक्का.

SHARE

स्विगी या अॅपची वाढती क्रेझ काही वेगळी सांगायला नको. खाद्यपदार्थ मागवण्यासाठी आता अनेक जण स्विगी ऑनलाईन अॅप वापरतात. सर्वांच्या आवडच्या अॅप स्विगीनं एक माहिती दिली आहे की, त्यांच्या अॅपवरून सर्वात जास्त चिकन बिर्यानी ऑर्डर केली जाते. गेल्या तीन वर्षात स्विगीवरून देण्यात आलेल्या ऑर्डरवरुन हा डाटा गोळा केला असून त्यावरून अहवाल तयार करण्यात आला.

मिनिटाला ९५ ऑर्डर

स्विगीनं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबरदरम्या देशभरात सर्वात जास्त ऑर्डर या चिकन बिर्यानीच्या घेण्यात आल्या होत्या. देशभरातून सर्वात जास्त चिकन बिर्यानीची ऑर्डर स्विगीवर देण्यात आली होती. प्रत्येक मिनिटाला जवळपास ९५ ऑर्डर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसऱ्या स्थानावर म्हणजेच त्याखालोखात सर्वात जास्त ऑर्डर मसाला डोशाच्या आणि तिसऱ्य़ा स्थानावर पनीर बटर मसाला असल्याचं सांगितलं. मागच्या तीन वर्षात आवडतं फूड म्हणून चिकन बिर्यानीला सर्वात जास्त पसंती देण्यात आली आहे. चिकन बिर्यानीनंतर मसाला डोशाला भारतात सर्वात जास्त पसंती देण्यात आली आहे

कुछ मीठा हे जाए

स्विगीच्या अहवालानुसार डेझर्ट म्हणजेच गोड पदार्थांमध्ये गुलाबजामला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. दुसऱ्या स्थानावर फालुदा असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तिसऱ्या स्थानावर मूगडाळीचा हलवा असल्याचं सांगितलं आहे.हेही वाचा

मार्गशीर्ष महिन्यात ट्राय करा 'या' हटके रेसिपी

मधुमेहग्रस्तांनी करावं 'या' ५ फळांचं सेवन

संबंधित विषय
ताज्या बातम्या