Advertisement

ट्राय करा नाॅनव्हेज मिसळ!

कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, मुंबईया तडका मिसळ अशा एक ना अनेक प्रकारच्या मिसळ खवय्यांनी चाखल्या आहेत. पण तुम्ही कधी नॉनव्हेज मिसळ ट्राय केलीय का?

ट्राय करा नाॅनव्हेज मिसळ!
SHARES

मिसळ हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आवडतं खाद्यपदार्थ आहे. मुंबईकर असो, पुणेकर असो वा कोल्हापूरकर असो पण मिसळ म्हटलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. मिसळ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती मटकीची उसळ त्यात बटाट्याची सुकी भाजी, थोडसं फरसाण वरून भुरभुरलेला कांदा, कोथिंबीर आणि त्यात गरमागरम झणझणीत तर्री आणि सोबतीला पाव... आहाहा! पण आम्ही तुमच्या या मिसळच्या चवीला थोडा ट्वीस्ट देणार आहोत. खरंतर थोडा नाही तर बराच वेगळा ट्विस्ट असणार आहे हा...


चिकन मिसळ

आतापर्यंत खवय्यांनी प्रत्येक राज्याची मिसळ चाखली असेल. मिसळ एक पण प्रत्येकाची चव मात्र वेगळी. कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, मुंबईया तडका मिसळ अशा एक ना अनेक प्रकारच्या मिसळ खवय्यांनी चाखल्या आहेत. पण तुम्ही कधी चिकन मिसळ ट्राय केलीय का? नाही? मग नॉनव्हेज प्रेमींसाठी भांडूपमध्ये उपलब्ध झाली आहे चिकन मिसळ...


मिसळला नॉनव्हेज तडका

'गोरेज् मिसळ' इथं व्हेज आणि नॉनव्हेज अशा सर्व प्रकारच्या मिसळ इथं चाखायला मिळतात. पण यात भाव खाऊन जाते ती चिकन मिसळ. चिकन मिसळ ही युनिक आणि सहसा कुठेही न मिळणारी अशी रेसिपी आहे. महाराष्ट्रात सर्वात प्रथम चिकन मिसळ गोरे यांनीच बनवली आहे. चिकन मिसळ, लिंबू फ्लेवर्ड स्प्राऊट, अनलिमिटेड रस्सा, बॉइल्ड बोनलेस चिकन आणि सर्वात खास म्हणजे ताटात दिलेला लांब आकाराचा पाव. फक्त ९९ रुपयात तुम्ही या मिसळचा आस्वाद घेऊ शकता.


मिसळसोबतच इथं सोलकढी, इडली, मेदूवडा, स्पेशल शिरा, पाणीपुरी चाट, ऑम्लेट, बुर्जी, चहाकॉफी तसंच व्हेज आणि नॉनव्हेज थाळी असं बरंच काही तुम्ही इथं खाऊ शकता. इथं बनवण्यात येणाऱ्या प्रत्येक पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे मसाले हे स्वत: गोरे कुटुंब घरी बनवतात. बाजारात येणाऱ्या कुठल्याच मसाल्यांचा वापर ते करत नाहीत. गोरे कुटुंब आणि त्यांच्या मदतीला ५ ते ६ बाहेरचे कामगार काम करतात.

- मंगल गोरे, मालक


अशी सुचली संकल्पना

केएफसी, मॅकडॉनल्डसारख्या आऊटलेट्समध्ये नॉनव्हेज पदार्थांना चांगलीच पसंती दिली जाते. त्यामुळे महाराष्ट्रीयन नाश्त्यामध्ये चिकनचा वापर करावा अशी कल्पना मंगल दयाराम गोरे आणि दीपक दयाराम गोरे या माय-लेकांना सुचली. छंद आणि आवडीपोटी मूळ रेसिपीमध्ये बदल करून, मसाल्यांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांनी अनेक पदार्थ घरी बनवायला सुरुवात केली. त्यानंतर भांडूपच्या लकी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये 'अन्नलक्ष्मी महिला गृहउद्योग' संचालित 'गोरेज् मिसळ' हे हॉटेल सुरू केलं. मिसळीवर ताव मारण्यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत इथं खवय्यांची गर्दी असते.

तुम्हाला जर चिकन मिसळचा आस्वाद घ्यायचा असेल तर 'गोरेजची मिसळ' नक्की ट्राय करा. तुम्हाला ही मिसळ आवडेल याची खात्री आहे.

कुठे - अन्नलक्ष्मी महिला गृहउद्योग (गोरेज् मिसळ), कोकण नगर बस स्टॉप जवळ, भांडुप ( प.)हेही वाचा -

नूडल्स शेक ट्राय केलंत का?

तंदुर चायनंतर आता तंदुर मॅगीची क्रेझ
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा