Advertisement

Coffee By Di Bella आता घऱपोच देणार डिलिव्हरी

आजपासूनच वांद्रे इथल्या आऊटलेटवर स्विगी आणि झॉमेटो द्वारे ही सेवा सुरू केली गेली आहे.

Coffee By Di Bella आता घऱपोच देणार डिलिव्हरी
SHARES

तुम्हाला वाचून आनंद होईल की प्रीमियम कॉफी ब्रँड, कॉफी बाय डी बेला होम डिलिव्हरी सेवा सुरू करत आहे. सोमवार म्हणजे आजपासूनच वांद्रे इथल्या आऊटलेटवर स्विगी आणि झॉमेटो द्वारे ही सेवा सुरू केली गेली आहे. १० मेपासून सांताक्रूझ, जुहू, वर्सोवा आणि लोखंडवाला इथल्या आऊटलेटटर्फे देखील ही सेवा पुरवली जाणार आहे.

वांद्रे इथल्या आऊटलेटमधून कॉफी आणि वॉफल्सची ऑर्डर आता तुम्ही देऊ शकता. यावेळी त्यांनी काही ताजे वॉफल्सची नाव देखील सुचवली आहेत. रॉकी रोड वॉफल, डार्क हॉट चॉकलेट, आईस्ड लाट्टे, दी बेलासीनो असी काही नावं आहेत.

कॉफी बाय दी बेलानं त्यांच्या ब्र्यूईंग मेनूमध्ये देखील नवीन पर्याय दिले आहेत. कॉफी बाय दी बेलानं सलग २ वर्षे एरोप्रेस चँपियनशिप जिंकली आहे.

पर्यायी पेय पद्धती- (मेनू संलग्न)

कोल्ड ब्रू कॉफी - कोल्ड ब्लॅक कॉफीवर १८ तास प्रक्रियाकेली जाते. त्यानंतर स्मुथ आणि ताजी अशी कॉफी तयार होते.

प्युवर कॉफी - ग्राउंड कॉफीवर गरम पाण्याचा वापर करून ही कॉफी तयार केली जाते.

आयस्ड पॉरव्हर कॉफी – मशिनमध्ये न बनवता हातानं ही कॉफी बनवली जाते. बर्फापासून तयार केलेले आमचे सिडनी मिश्रण यात वापरले जाते.

एरोप्रेस कॉफी - कॉफी मायक्रोफिल्टरद्वारे सौम्य हवेच्या दाबसह तयार केली जाते. ही कॉफी देखील सिडनी मिश्रण वापरुन तयार केली जाते.

आमच्या ब्लेन्ड नोट्स-

प्रीमियम ब्लेंड - डार्क चॉकलेट, कॅरेमल, मनुका

सिडनी ब्लेंड - डार्क चॉकलेट, व्हॅनिला, कॅरेमल, हेझलनट

खालील लिंकवर डिलिव्हरी मेन्यू आहे.

https://www.zomato.com/mumbai/coffee-by-di-bella-1-pali-hill-bandra-west/order

Delivering via Zomato & SwiggyRead this story in English
संबंधित विषय
Advertisement