Advertisement

रेडी फॉर 'बीअर ऑलिंपिक्स'?


रेडी फॉर 'बीअर ऑलिंपिक्स'?
SHARES

बीअर आणि स्पोर्ट्स?... ऐकायला विचित्र वाटतं ना? पण हे कॉम्बिनेशन आहे भन्नाट. तुम्हालाही प्रत्यक्ष या हटके स्पोर्ट्सचा भाग व्हायला नक्कीच आवडेल. २൦ मेला पुण्यात बीअर ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं आहे. डुलाली कॅफेतर्फे या बीअर ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले आहे. २൦१२ पासून डुलाली कॅफे या ऑलिंपिक्सचे आयोजन करत आहे.

आर यु रेडी फॉर धिस गेम्स


  • जेंगा

या गेममध्ये लाकडी लांबट ठोकळे एकमेकांवर रचायचे असतात. एकूण ५४ ठोकळे असतात. एका वेळी तीन ठोकळे शेजारी ठेवून अठरा मजल्यांचा टॉवर सुरुवातीला रचायचा. 

आता या टॉवरमधून हळूच कोणताही एक ठोकळा काढायचा आणि अलगद अगदी वर ठेवायचा. पण असं करताना तोल जाऊन टॉवर पडणार नाही याची नीट काळजी घ्यायची. हा गेम खेळायचा पण हे खेळताना तुम्ही ड्रंक असणार. त्यामुळे ड्रंक व्यक्तीसाठी हा गेम एक आव्हान आहे.


  • फ्लेटर

पेपरमध्ये येणारी शब्दकोडी सोडवणे हा तर कित्येकांच्या दिनक्रमाचा एक भाग असतो. हाही अशाच प्रकारचा मनोरंजक आणि बुद्धीला चालना देणारा खेळ आहे. एका स्क्रिनवर तुम्हाला अक्षरं दिली जातील. त्यानुसार तुम्हाला एक शब्द तयार करायचा आहे आणि तुमच्या प्रतिस्पर्धी आधी तो शब्द तुम्हाला मोठ्या आवाजात बोलायचा आहे.


  • डार्ट्स

याला नेमबाजी ही म्हणता येईल. नेमबाजी हा माइंड गेम आहे. त्यासाठी मन सक्षम लागतं. खेळाला एकाग्रता गरजेची आहे. तुमच्या समोर डार्टबोर्ड असतो. त्यावर डार्टनं तुम्हाला अचूक नेम लावायचा असतो. पण तुम्ही ड्रंक असाल तर तुम्हाला हा गेम खेळणं आव्हान आहे.

असे अनेक गेम तुम्ही इथे खेळू शकता. पण हे गेम खेळताना तुम्ही ड्रंक असणार. त्यामुळे हे गेम खेळणं तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे. या ऑलिंपिकसाठी जर्मन मॉल्ट्सपासून (गहू) बनवण्यात आलेली बीअर मागवण्यात आली आहे. त्यामुळे ती स्मूथ आणि हलकी असणार आहे.

तुम्हाला या गेमसाठी चार जणांची टीम लागेल. चार जणांसाठी ८൦൦൦ रुपये तुम्हाला मोजावे लागतील. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकी २൦൦൦ रुपये तुम्हाला द्यावे लागतील. यात तुम्हाला प्रत्येकाला एक बीअर ऑलिंपिक किट दिलं जाईल. यात तुम्ही पाच गेम्सचा आनंद घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला स्नॅक बॉक्स आणि दोन लीटर बीअर दिली जाईल. यासोबतच तुम्ही जर ड्रंक असाल तर डुलाली कॅफे तुम्हाला घरापर्यंत सोडेल. त्यासाठी डुलाली ८൦൦ रुपये तुमच्याकडून आकारेल.

तुम्ही हा गेम जिंकलात तर ५൦ हजाराचं ग्रॅण्ड प्राईज मिळणार. त्यासोबतच एक गोल्डन मग मिळणार. जर तुम्हाला या गेम्सचा आनंद घ्यायचा आहे तर २൦ मेला पुण्याला भेट द्यायला विसरू नका. पुण्यातल्या द फर्स्ट ब्रुहाऊस कॉरेंथियन रिसॉर्ट अँड क्लब हाऊस येथे भेट द्या. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर beerolympics.in या वेबसाईटला भेट द्या.

डुलाली टॅपरूमचे मुंबईत अनेक बीअर कॅफे आहेत. वांद्रे, अंधेरी, कोलाबा येथे असलेल्या बीअर कॅफेमध्ये तुम्हाला तरूण-तरूणी हँगआऊट करताना दिसतील.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा