फक्त 10 रूपयांत पोटभर जेवण!

 Matunga
फक्त 10 रूपयांत पोटभर जेवण!

माटुंगा - निरंजन पारेख मार्ग येथील 'राज रोटी सेंटर'मध्ये गरजूंना 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. श्रीमद रामचंद्र आत्म तत्व रिसर्च सेंटर (पर्ली) येथील सानीसा या आश्रमाच्या माध्यमातून गरजू लोकांना फक्त 10 रुपयात जेवणाचे पॅकेट दिले जात आहेत. यामध्ये 6 चपाती, भाजी आणि एक केळं असे संपूर्ण जेवण किमान 10 रुपयात दिले जाते.

गरजू म्हणजेच ज्यांचा पगार महिन्याला 8 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा लोकांनाच फक्त हे 10 रुपयाचे जेवण देण्यात येते. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत हे सेंटर चालू असते, तर दिवसातून 30 ते 40 गरजू या उपक्रमाचा फायदा घेतात.

'राज रोटी सेंटर' मे 2016 पासून कार्यरत आहे. सुरुवातीला फक्त 5 महिलांच्या सहकार्याने हे 'राज रोटी सेंटर' सुरू केले गेले होते. आता हे काम करणाऱ्या महिलांची संख्या 5 वरून 10 वर गेली आहे. गरजू लोकांना मदत करणे हाच 'राज रोटी सेंटर'चा खरा उद्देश आहे. अनेकांचे चांगले सहकार्य या कामात आम्हाला मिळते, असे संयोजिका स्वाती कामदार यांनी सांगितले.

Loading Comments