Advertisement

पावसाळ्यात 'हे' पदार्थ एकदा तरी ट्राय कराच

पावसाळ्यात गरमागरम भजी, चहा किंवा बटाटे वडे यांसारख्या पदार्थांना भारी डिमांड असते. पण तुम्ही हे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर तुमच्यासाठी हटके पदार्थांची यादी देणार आहोत. याशिवाय हे सुद्धा सांगणार आहोत की या पदार्थांचा आस्वाद तुम्ही कुठे घ्याल?

पावसाळ्यात 'हे' पदार्थ एकदा तरी ट्राय कराच
SHARES

पावसाच्या सरी बरसल्या की, वातावरणात गारवा पसरतो. अशातच चटपटीत पदार्थांची सोबत मिळाली तर त्या मैफिलीची बात काही औरचं. पावसाळ्यात गरमागरम भजी, चहा किंवा बटाटे वडे यांसारख्या पदार्थांना भारी डिमांड असते. पण तुम्ही हे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर तुमच्यासाठी हटके पदार्थांची यादी देणार आहोत. याशिवाय हे सुद्धा सांगणार आहोत की या पदार्थांचा आस्वाद तुम्ही कुठे घ्याल?


) मोमोज

मुंबईच्या काही भागांमध्ये अलीकडच्या काळात एक वेगळा पदार्थ गर्दी खेचू लागला आहे तो म्हणजे मोमोज. इडली तयार करण्यासारख्याच जर्मनच्या मोठ्या भांड्यात हा पदार्थ तयार केला जातो. दिसायला नक्षीदार, पाहताच क्षणी भूक चाळवणारा, पचायला हलका आणि खिशालाही परवडणारा. तुम्हाला जर मोमोजचा आश्वाद घ्यायचा असेल तर चेंबूर गाठा आणि ‘मोमोज शाऊट’ला भेट द्या


अस्मिता सदामस्त या मराठमोळ्या तरुणीने वर्षभरापूर्वीच मोमोज शाऊटची सुरुवात केलीय. मोमोज शाऊटमध्ये व्हेज मोमोज, व्हेज चीज, पनीर, पनीर शेझवान, चिली पनीर, कॉर्न अ‍ॅण्ड चीज, मशरूम शेझवान, व्हेज चीज शेझवान असे तब्बल आठ पर्याय आहेत. तर नॉनव्हेजमध्ये चिकन, चिकन चीज, चिकन शेझवान, चिली चिकन, चिकन कॉर्न अ‍ॅण्ड चीज असे पाच पर्याय आहेत. स्टीम म्हणजेच फक्त वाफवलेले, डीप फ्राय म्हणजे तळलेले आणि पॅन फ्राय म्हणजेच तळून घेऊन नंतर पुन्हा पॅनमध्ये ग्रेव्हीसह परतवून घेतलेले असे तीनही प्रकारचे मोमोज इथं चाखता येतील.

कुठे : मोमोज शाऊट, शॉप नंबर ३, प्लॉट नंबर ११६, एकज्योत सत्कार सोसायटी, कलेक्टर्स कॉलनी, स्वामी विवेकानंद रोड, चेंबूर

कधी : सोमवार ते रविवार

वेळ सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत

) रगडा पाव पॅटीस

काही पदार्थ आपल्या विशेष जिव्हाळ्याचे असतात. लहानपणापासून आपली त्यांच्याशी ओळख असते, सलगी असते. अशाच पदार्थांपैकी एक, म्हणजे रगडा पॅटीस. माणसाची जशी माकडापासून उत्क्रांती झाली म्हणतात, तशी या पदार्थाची एका पदार्थापासून उत्क्रांती झाली आहे, असं म्हणता येईल

साधारण ब्रेडपासून बनवला जाणारा हा प्रकार चिंचपोकळी स्टेशनजवळीव कविता वडापाव स्टॉलवर वेगळ्या पद्धतीनं सर्व्ह केला जातो. पॅटीसमध्ये साधारण ब्रेड वापरला जातो. पण इथं ब्रेडच्या ऐवजी पाव वापरला जातो. पावाच्या एका बाजूला बटाट्याची भाजी लावली जाते. त्यानंतर चण्याच्या पिठात बुडवून त्याला तेलात तळलं जातं. तळून झाल्यावर बाहेर काढून त्याचे सहा तुकडे केले जातात. त्यावर रगडा आणि तीखट, गोड चटणी टाकली जाते आणि गरमागरम सर्व्ह केलं जातं

कुठे : कविता वडापाव, चिंचपोकळी स्टेशन जवळ (पू.)

कधी : सोमवार ते रविवार

वेळ संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत


) अंडा पराठा, अंधेरी

आतापर्यंत तुम्ही साधा पराठा, पनीर पराठा, आलू पराठा असे काही प्रकार खाल्ले असतील. पण तुम्ही कधी अंडा पराठा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला. तर आम्ही सांगणाऱ्या ठिकाणी जाऊन हा अंडा पराठा नक्की ट्राय करा.

आधी तव्यावर परोठा टाकून शेकवला जातो. दोन्ही बाजूनं चांगल्याप्रकारे पराठा शेकल्यावर त्याला एका बाजूनं चिर मालली जाते. त्यानंतर एका भांड्यात अंड फेटलं जातं. त्यात कांदा, मिरची, हळद, हिंग, कोथिंबीर हे साहित्य टाकलं जातं. हे मिश्रण पराठ्याच्या चिर मारलेल्या जागेतून आत टाकतात. पराठ्याला चांगलं दोन्ही बाजूनं शेकलं की गरमागरम अंडा पराठा तुम्हाला सर्व्ह केला जातो

कुठे : चंदन पराठा, वीरा देसाई रोड, अंधेरी

कधी : सोमवार ते रविवार


) कॉर्न चीज भेळ

पाऊस आणि गरमागरम कणिस खाण्याची मजाच काही और. पावसाळ्यात भाजलेल्या कणसाला मसाला-लिंबू मारून आवडीनं खालं जातं. पण आम्ही हाच मका एका वेगळ्या रूपात तुमच्या समोर आणत आहोत. कॉर्न भेळ...


सुकीभेळ किंवा ओली भेळ नाही तर ही आहे विजय भुट्टावालाची प्रसिद्ध कॉर्न भेळ. यात खास गोष्ट म्हणजे उकडलेल्या मक्याच्या कणसासोबत यात दोन प्रकारच्या चटणी, चिमूटभर मसाला, चवीनुसार मीठ इत्यादी गोष्टींसोबत या कॉर्न भेळची चव स्वादिष्ट लागते. यासोबतच ते बटर मसाला कॉर्न आणि बटर मसाला चीज कॉर्न देखील तुम्ही ट्राय करू शकता

कुठे : विजय भुट्टावाला, नोबेल केमिस्टच्या समोर, अमृत धारा बिल्डींग, जामे जमशद रोड, माटुंगा (पू.)

कधी : सोमवार ते रविवार

वेळ दुपारी ३ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत


) आलु हंडी

आलु हंडी हा प्रकार तुम्ही कदाचित ऐकला नसेल. खरंतर हा प्रकार भन्नाट आहे. उकडलेले बटाट्याचे दोन तुकडे केले जातात. त्यानंतर एका बाजूच्या बटाट्याच्या मधला भाग काढून त्याला पुरीसारखा वापरता येईल असा आकार दिला जातो.


 त्यानंतर त्यात स्पेशल मसाले, कांदा, उकडलेले चणे, आणि आंबट-गोड चटणी टाकून पाणी-पुरीसारखं सर्व्ह केलं जातं. याची किंमत देखील खिश्याला परवडणारी आहे. फक्त ५-६ रुपयांमध्ये तुम्ही आलु-हंडी ट्राय करू शकता

कुठे : सायन सर्कल जवळ, गुरुक्रिपा हॉटेल जवळ, सायन

कधी सोमवार ते मंगळवार


) चावला छोले भटुरे

दिल्ली शहरातील लोकप्रिय खाणे म्हणजे छोले-भटुरे. हे छोले-भटुरे म्हणजे पंजाबी संस्कृतीमधील सर्वश्रुत पदार्थ. परंतु मुंबईत सुद्धा दिल्लीच्या चवीसमान गरम-गरम छोले-भटुरे मिळतात. हे ठिकाण जीटीबी नगर म्हणजेच सायं कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनी जवळ चावला ढाब्यांमध्ये हे लज्जतदार छोले- भटुरे मिळतात.


यातील छोलेमध्ये मसाल्याच्या चवीसाठी योग्य प्रमाणात गरम मसाला आणि तिखट चवीकरिता आल्याचा देखील उत्तमरीतीने यात वापर केला जातो. तसेच भटुरे तळताना पूर्णपणे फुगलेले आणि कापसाप्रमाणे नरम असतात. याची किंमत ४० रुपये आहे.


कुठे : चावला छोले-भटुरे, बिल्डिंग नंबर २०, शॉप नंबर युएसी-४२१, हरी मंदिर जवळ, पंजाबी कॉलनी, जीटीबी नगर


) मॅगी, हंग्री हेड

मॅगी खायला कुणाला नाही आवडत? आजपर्यंत तुम्ही मॅगीचे किती प्रकार ट्राय केले आहेत? एक तर मसाला मॅगी आणि दुसरी चिकन मॅगी. बस... संपली तुमची यादी. पण जर तुम्हाला मॅगीचे ३० प्रकार खायला मिळाले तर? आहे ना भन्नाट

माटुंग्यातील मॅगीवाला या इटरीमध्ये तुम्हाला ३० प्रकारच्या वेगळ्या मॅगी ट्राय करायला मिळतील. चिली गार्लिक, थाऊजंड आयलंड, मिंट, अलफ्रेडो, मयो, हाक्का, इंडियन तडका अशा अनेक प्रकारच्या मॅगींची चव तुम्ही चाखू शकता. फक्त एवढंच नाही. मॅगी सूप, मॅगी बुरजी आणि मॅगी पिझ्झा देखील तुम्हाला इथं खायला मिळेल. याशिवाय पास्ता आणि शेक्स मॅगीसोबत पेअर करून तुमच्यासमोर सर्व्ह केले जातील. यासाठी तुम्हाला ४५ ते १०० रुपये मोजावे लागतील.

कुठे : मॅगीवाला, नूर महल, प्लॉट नंबर ५४, तळ मजला, किंग सर्कल जवळ, माटुंगा


) ७५ फ्लेवर्सचा चहा

गरम चाय की प्याली हो...उसको पीलानेवाली हो या नही हो...लेकीन गरम चाय की प्याली हो! सुख असो दु:ख असो वा टेन्शन असो वा आनंद...पण एक कप चहा सर्वांचीच कमजोरी...गाडीत पेट्रोल टाकलं की ती धावते. तसंच काहीसं आपलं आहे. जोपर्यंत गरमा गरम चहाचा एक घोट घेत नाही, तोपर्यंत समाधानच मिळत नाही. कारण खाद्य मैफलींची रंगत वाढते ती चहानेच!

चहा म्हणजे केवळ साखर, चहा पावडर आणि दुधाचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलिकडेही चहाचे चविष्ट प्रकार आहेत. जुहूतल्या द केटलरी ( The kettlery) इथं तुम्हाला अशाच वेगवेगळ्या चहांचा आस्वाद घेता येईल! साधा चहा, मसाला चहा, ग्रीन टी, जिंजर टी चहाचे हे फ्लेवर्स तर सर्वांनाच माहीत असतील. पण केटलरीमध्ये जवळपास ७५ फ्लेवर्सचे चहा तुम्ही ट्राय करू शकता. चॉकलेट फ्लेवर मिक्स्ड टी, वेगवेगळे फ्रुट मिक्स्ड टी, आईस टी असे वेगवेगळे फ्लेवर्स इथं तुम्ही ट्राय करू शकता.

कुठे : पहिला मजला, होरीजन, ३७ जुहू बीच, जुहू


) चॉकलेट फॉन्ड्यू

एक अजून नावीन्यपूर्ण प्रकार म्हणजे चॉकलेट फॉन्ड्यू अर्थात चॉकलेटचे कारंजे. एका मोठ्या बाऊलमध्ये बेल्झियम लिक्विड चॉकलेट तुम्हाला दिलं जातंत्या चॉकलेटमध्ये तुम्ही ब्राऊनीकुरकुरीत बिस्कीटफळं आणि व्हेनिला केक असे पदार्थ डिप करून खाऊ शकता. 'द रोलिंग पिन' इथं तुम्ही या चॉकलेटच्या कारंज्याचा आस्वाद घेऊ शकता


कुठे - द रोलिंग पिन, १२ जनता इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बापट रोड, फिनिक्स मॉलच्या समोर, लोअर परेल, मुंबई – ४०००१३



हेही वाचा

वडापावला नवा तडका, मुंबईतील 'हे' १० हटके वडापाव आणतील तुमच्या तोंडाला पाणी

खिचडी १ फ्लेवर्स १०१



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा