Advertisement

खिचडी १ फ्लेवर्स १०१

खरंतर साध्या पद्धतीनंचं खिचडी केली जाते. मात्र पूर्णाहाराला पर्याय म्हणून नाना चवीढवीची आणि नाना मसाल्यांची चटकमटकदार अशा खिचडीचा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे बोरीवलीतील 'खिचडी गार्डन'

खिचडी १ फ्लेवर्स १०१
SHARES

साग्रसंगीत जेवण करायचा कंटाळा आलेला असेल, आणि काहीही तडकभडक खायचं नसेल, तर घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी! तांदुळ-मूग एकत्र धुऊन कडकडीत तेलावर जिरं-मोहरीची फोडणी द्यायची. फोडणी तडतडली की त्यात धुतलेले तांदुळ-मूग वैरायचे. शिजता-शिजताच खिचडीचा खमंग वास असा काही दरवळतो की पातेल्यातली खिचडी ताटात आणि ताटातली खिचडी पोटात कधी जातेय, असंच होऊन जातं. या वाफाळत्या खिचडीवर साजूक तुपाची धार सोडली आणि लिंबाची फोड पिळली की खिचडीला जी चव येते ती शब्दात सांगणं कठीणच.

खरंतर साध्या पद्धतीनंचं खिचडी केली जाते. मात्र पूर्णाहाराला पर्याय म्हणून नाना चवीढवीची आणि नाना मसाल्यांची चटकमटकदार अशा खिचडीचा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. बोरिवलीतील एका रेस्टॉरंटमध्ये चक्क १०१ प्रकारच्या वेगवेगळ्या खिचडी ट्राय करता येतील.


खिचडी एक, प्रकार अनेक

बोरीवलीतील 'खिचडी गार्डन' तुम्हाला १०१ प्रकारच्या वेगवेगळ्या खिचडी सर्व्ह करत आहे. खिचडी हा प्रकार साधारण घरात बनवण्या इतका सोप्पा तर असतोच. पण तरीही या रेस्टॉरंटनं खिचडीचे वेगवेगळे प्रकार खवय्यांना चाखता यावेत यासाठी एकप्रकारे मोठी जोखीमच घेतली आहे असं म्हटलं तर काही गैर नाही.

आपण घरी जरी खिचडी केली तरी किती प्रकारची खिचडी करू शकतो? जास्तीत जास्त दोन किंवा तीन. पण इथं तुम्हाला भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात बनवण्यात येणाऱ्या खिचडीचा आस्वाद तर घेता येईलच. यासोबतच भारताबाहेर बनवण्यात येणाऱ्या खिचडीचा देखील आस्वाद घेता येईल.



१०१ खिचडीचे प्रकार

परंपरागत खिचडीशिवाय इथं सेजवान खिचडी, पेस्ट खिचडी, पोंगल खिचडी, मॅकरोनी खिचडी, बिसी बेवे भात खिचडी, चायनीज खिचडी, टाको खिचडी, आचारी पनीर खिचडी, ओट्स खिचडी, आलू-ऑरेंज खिचडी, पुदिना पायनॅपल खिचडी... हुश्श... नावाची यादी काही संपत नाही.


कुटुंबियांसोबत मेजवानी

अशा १०१ प्रकारच्या खिचडी खाण्याची मजाच काही औरच. १०१ पैकी तुम्हाला आवडेल ती खिचडी तुम्ही ट्राय करू शकता. कुटुंबियांसोबत जात असाल तर मग काय वेगवेगळ्या खिचडीची ऑर्डर द्यायची. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी तुम्ही ट्राय करू शकता. आणि ट्राय केली असेल तर कुठली खिचडी तुम्हाला आवडली हे देखील आम्हाला कळवा.

कुठे : खिचडी गार्डन, शिंपोली रोड, रीलायन्स मॉलच्या समोर, दळवी नगर, बोरीवली (.)

संपर्क : ०२२२८९८४००५

किंमत : अंदाजे २२५ (लहान) आणि ३५५ (मोठे)



हेही वाचा

वडापावला नवा तडका, मुंबईतील 'हे' १० हटके वडापाव आणतील तुमच्या तोंडाला पाणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा