Advertisement

पारसी सणानिमित्त स्पेशल ट्रीट

पारशी वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि सकारात्मकतेनं पारशी धर्मीय शुभारंभ करतात. आज आम्ही तुम्हाला पारसी सणानिमित्त उत्तम मेजवानी देणार आहोत.

पारसी सणानिमित्त स्पेशल ट्रीट
SHARES

पारशी धर्मीयांच्या नववर्षाचा आज पहिला दिवस आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या या पहिल्या दिवसाला 'नवरोज' म्हटले जाते. नववर्ष निमित्तानं पारशी धर्मीय अग्यारीमध्ये जाऊन प्रार्थना करुन आशिर्वाद घेतात. पारशी समाजाच्या पारंपरिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो. पारशी वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि सकारात्मकतेनं पारशी धर्मीय शुभारंभ करतात. आज आम्ही तुम्हाला पारसी सणानिमित्त उत्तम मेजवानी देणार आहोत.


१) गलोप्स

गलोप्समध्ये तुम्हाला नवरोजनिमित्त खाज मेन्यू ट्राय करता येईल. १४ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला इथं खास ट्रिट मिळेल. त्यांच्या स्पेशल मेन्यूमध्ये नवसारी नी बोई, पेसू नी पात्रा मी मच्छी, फेरदोन ना फारचा, अफलातून अकुरी, टोपली नु पनीर असे पदार्थ समाविष्ट आहेत.

कुठे : महालक्ष्मी रेसकोर्स, गेट नंबर १ जवळ, केशवराव खाडे मार्ग, महालक्ष्मी


२) हेमंत ओबेरॉय

पारसी सणानिमित्त हेमंत ओबेरॉय रेस्टॉरंटमध्ये पारसी पद्धतीचं जेवण चाखता येणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीचं जेवणं तुम्ही ट्राय करू शकता.

कुठे : ५, तळ मजला, जेट एअरवेज गोदरेज बिल्डींग, जी ब्लॉक, बीकेसी, बांद्रे

३) कंट्री ऑफ ओरीजन

पारसी सणानिमित्त कंट्री ऑफ ओरीजननं देखील एक स्पेशल मेन्यू लाँच केला आहे. चॉकलेट, हेजलनट नी बोई, ट्रेडिशनल रावो असे पदार्थ चाखता येतील.

कुठे : मलबार हिल, लोअर परेल, वांद्रे, जुहू


४) सोडा बॉटल ओपनरवाला

पारसी सण साजरा करायचा असेल तर सोडा बॉटल ओपनरवाला इथं तुम्ही भेट देऊ शकता. २४ ऑगस्टपर्यंत त्यांनी पारसी फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारांमध्ये स्वादिस्ट पदार्थ तुम्हाला खाता येतील.  


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा