Advertisement

मॅगी वडापाव ट्राय केलात का?


मॅगी वडापाव ट्राय केलात का?
SHARES

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा इंडियन बर्गर. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेलच. इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणाऱ्या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. यापैकीच एक आहे घाटकोपरमधील लक्ष्मण ओम वडापाव. आता तुम्ही म्हणाल यात काय खास? अरे इतर वडापावसारखा हा वडापाव नाही.


बेसनचं कव्हर

लक्ष्मण ओम वडापावचा वडा सर्वांपेक्षा बराच वेगळा आहे. फक्त चवीनं नाही तर त्याच्या बनवण्याच्या पद्धतीनं देखील हा वडापाव भाव खाऊन जातो. साधारण वडापाव म्हटलं की त्यात बटाटा असतो. पण इथल्या वडापावचा एक घास खाल्ला की तुम्हाला याच्या वेगळेपणाची प्रचीती येईल. कारण याच्या आत बटाटा नाही तर मॅगी असते आणि वर बेसनचं कव्हर असतं.


स्पेशल मसाले

पहिल्यांदाच मॅगी आणि वडापाव हे दोन वेगळे पदार्थ एकत्र करून मॅगी वडापाव तयार करण्यात आला. हो... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. मॅगी वडापाव... आतून सॉफ्ट आणि बाहेरून स्क्रिस्पी असा हा वडापाव... आहे की नाही भन्नाट प्रकार... वडापाव बनवण्यासाठी स्पेशल मसाल्यांचा वापर केला जातो. हा वडापाव तुम्हाला त्यांनी बनवलेल्या चटणीसोबत सर्व्ह केला जातो.

कुठे : लक्ष्मण ओम वडापाव, १९, बिल्डींग १०४, गरोडिया नगर, घाटकोपर (पू.)
कधी :
सकाळी ९ ते रात्री ९.३०
किंमत :
अंदाजे १०० ( दोघांचे) 


हेही वाचा

फ से फूड...

कचरा खाणारं अनोखं बास्केट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा