Advertisement

माहिममध्ये मनसेचा मिसळ महोत्सव!


माहिममध्ये मनसेचा मिसळ महोत्सव!
SHARES

विलेपार्ल्यामध्ये मिसळोत्सव झाल्यानंतर आता दादरजवळ माहिममध्ये मिसळोत्सव होणार आहे. मिसळ म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटणारच! मग ती कोल्हापूरची लालभडक-झणझणीत मिसळ असो, नाशिकची काळ्या मसाल्याची मिसळ असो किंवा पुण्याची बटाट्याची भाजी घालून केलेली मिसळ. मिसळ हा आपला वीक पॉइंटच आहे म्हणा ना!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मिसळप्रेमी मुंबईकरांसाठी थेट दादरजवळ मिसळोत्सव भरवण्यात येणार आहे. शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस माहिम येथील मोगल लेन येथे तीन दिवसांच्या शानदार अशा 'मनसे मिसळ महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांतील मिसळची चव मुंबईकरांना एकाच ठिकाणी अनुभवता यावी, यासाठी या मिसळ महोत्सवाचे आयोजन आम्ही केले आहे. या महोत्सवात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, संगमेश्वर अशा विविध ठिकाणच्या सुप्रसिद्ध मिसळींवर ताव मारण्याची संधी मुंबईकरांना मिळेल.

नितीन सरदेसाई, सरचिटणीस, मनसे

विशेष म्हणजे, टीव्ही व सिने-नाट्यसृष्टीतील ख्यातनाम कलावंतांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.


संबंधित विषय
Advertisement