Advertisement

बिअर प्रेमींसाठी अाॅलिम्पिक, बिअर प्या आणि खेळा


बिअर प्रेमींसाठी अाॅलिम्पिक, बिअर प्या आणि खेळा
SHARES
Advertisement

बिअर आणि स्पोर्ट्स?... ऐकायला विचित्र वाटते ना? पण हे काँबिनेशन आहे भन्नाट. तुम्हालाही प्रत्यक्ष या हटके स्पोर्ट्सचा भाग व्हायला नक्कीच आवडेल. ४ ऑगस्टला मुंबईत डुलाली टँपरूमकडून बिअर अाॅलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं आहे. २०१२ पासून डुलाली कॅफे या अाॅलिम्पिकचं आयोजन करत आहे.हटके गेम्स

बिअर अाॅलिम्पिकमध्ये पाच गेम्सचे प्रकार असतात. विशेष म्हणजे हे गेम्स तुम्हाला बिअर पित खेळायचे आहेत. त्यामुळे तोल सांभाळत गेम्स खेळणं म्हणजे तुमच्यासाठी मोठा टास्कच आहे. यासाठी तुम्हाला चार जणांची एक टीम करावी लागेल.   


बिअर पोंग 

बिअर पोंग हा गेम बेरुत या नावानं देखील ओळखला जातो. हा खेळ टेबल टेनिसच्या टेबलावर किंवा जेवणाच्या टेबलावर खेळला जातो. यासाठी ग्लासेस आणि टेबल टेनिसचा बॉल आवश्यक असतो. प्रत्येक संघ टेबलाच्या उलट बाजूवर उभे राहतात

टेबलाच्या दोन्ही विरुद्ध कडांवर बिअरनं भरलेले ग्लास ठेवलेले असतात. स्पर्धकांनी विरुद्ध टिमच्या ग्लासमध्ये एका ठरावीक अंतरावरून पिंग बॉल शूट करण्याचा प्रयत्न करायचा. जर बॉल ग्लासमध्ये पडल्यास विरुद्ध टिमच्या सदस्यांपैकी एकानं त्या ग्लासातील बिअर प्यायची


बिअर जेंगा

या गेममध्ये लाकडी लांबट ठोकळे एकमेकांवर रचायचे असतात. एकूण ५४ ठोकळे असतात. एका वेळी ३ ठोकळे शेजारी ठेवून १८ मजल्यांचा टॉवर सुरुवातीला रचायचा. आता या टॉवरमधून हळूच कोणताही एक ठोकळा काढायचा आणि अलगद अगदी वर ठेवायचा. ण असं करताना तोल जाऊन टॉवर पडणार नाही याची नीट काळजी घ्यायची. हा गेम खेळताना तुम्ही ड्रंक असणार. त्यामुळे ड्रंक व्यक्तीसाठी हा गेम एक अाव्हान आहे.


डार्ट्स

याला नेमबाजीही म्हणता येईल. नेमबाजी हा माइंड गेम आहे. त्यासाठी मन सक्षम लागतं. खेळाला एकाग्रता गरजेची आहेतुमच्या समोर डार्टबोर्ड असतो त्यावर डार्टनं तुम्हाला अचूक नेम लावायचा असतो. पण तुम्ही ड्रंक असाल तर तुम्हाला हा गेम खेळणं अाव्हानात्मक आहे.


अाॅलिम्पिकसाठी खास बिअर

असे अनेक गेम तुम्ही इथे खेळू शकता. पण हे गेम खेळताना तुम्ही ड्रंक असणार. त्यामुळे हे गेम खेळणं तुमच्यासाठी अाव्हान आहे. पण सर्वात महत्त्वाचं बिअर अाॅलिम्पिकसाठी वयोमर्यादा आहे. २१ आणि त्याच्याहून अधिक वयोगटातील तरूण-तरूणींना यात सहभागी होता येईल. या अाॅलिम्पिकसाठी जर्मन मॉल्ट्सपासून (गहू) बनवण्यात आलेली बीअर मागवण्यात आली आहे. त्यामुळे ती स्मूथ आणि हलकी असणार आहे.

बिअरसाठी तुम्हाला ३०००  रुपये आणि फूडसाठी तुम्हाला ६०० रुपये मोजावे लागतील. जर तुमची चार जणांची टीम असेल तर तुमच्याकडून १२ हजार रुपये आकारले जातील. यासोबत तुम्हाला अाॅलिम्पिक टी शर्टअॅथलिट किट आणि विजेत्यांना अनेक बक्षिसं देण्यात येतीलनोंदणी करण्यासाठी या  http://beerolympics.in/ लिंकवर क्लिक करा

कधी : ४ ऑगस्ट २०१८

वेळ : दुपारी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

कुठे : डूलाली टापरूम, राजकुटीर,१० ए,राम कृष्णा नगर, खार(.),मुंबईहेही वाचा

मुंबईत इथे मिळेल स्पेशल बीअर ट्रीट!
संबंधित विषय
Advertisement