Advertisement

भारतात UberEats बंद, जाणून घ्या यामागचं कारण

आता उबर इट्सच्या ग्राहकांना झोमॅटोवरून ऑर्डन द्यावी लागणार आहे. कारण इतक्या कोटीमध्ये Zomato नं UberEats खरेदी केला.

भारतात UberEats बंद, जाणून घ्या यामागचं कारण
SHARES

ऑनलाईन खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी बहुतांश ग्राहक वेगवेगळ्या अॅपवर अवलंबुन असतात. त्यापैकी बरेचसे उबर इट्सचा वापर करतात. एक तर खिशाला परवडतील असे उबरचे दर, डिलिव्हरी फी देखील कमी आणि खाद्य पदर्थांवर मिळणारे डिस्काऊंट यामुळे ग्राहक उबरकडे खेचले जातात.

उबर इट्स बंद

पण आता उबर इट्सवरून जेवण मागवणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. उबर इट्स हे अॅप बंद जाले आहे. उबर इट्सनं मेलद्वारे आणि त्यांच्या अॅपच्या मदतीनं ग्राहकांना ही माहिती दिली आहे. याचं कारण म्हणजे झोमॅटो. झोमॅटोनं उबर इट्सचे भारतातील सर्व हक्क विकत घेतले आहेत



फक्त भारतात बंद

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने भारतातील आपला बाजार अधिक वाढवण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं आहे. झोमॅटोनं प्रतिस्पर्धी फूड डिलिव्हरी कंपनी उबर इट्सला टेकओव्हर करत त्याचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. हा करार केवळ भारतासाठी झाला आहे. झोमॅटोनं केवळ भारतातील उबर इट्सचे हक्क विकत घेतले आहेत. इतर देशांमध्ये उबर इट्स सुरू राहील.

'इतक्या' किंमतीत झाला करार 

दोन्ही कंपन्यांमधील हा करार काल रात्री ३ वाजता पार पडला आणि सकाळी ७ नंतर उबर इट्सचे ग्राहक झोमॅटो अ‍ॅपवर शिफ्ट होण्यास सुरू झाले. या करारानंतर देखील उबर इट्सचे कंपनीत ९.९ टक्के शेअर असतील. हा करार ३०० ते ३५० मिलियन डॉलर्सचा म्हणजे जवळपास २ हजार ५०० कोटी रुपये इतका आहे.

कॅब बिझनेसकडे लक्ष देणार

झोमॅटो सध्या भारतातील क्रमांक एकची फूड डिलिव्हरी कंपनी आहे. देशातील ५०० पेक्षा अधिक शहरांमध्ये कंपनी आपली सेवा देते. मागील काही दिवसांपासून उबर इट्सनं भारतातील अनेक शहरांमध्ये आपला विस्तार केला होता. उबर इट्सकडून प्रतिस्पर्धी कंपन्या झोमॅटो आणि स्विगीला टक्कर मिळत होती. उबर आता भारतात कॅब बिझनेस वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. देशातील ५० शहरात उबरची कॅब सेवा आहे. कंपनी हा आकडा २०० वर नेणार आहे.



हेही वाचा

३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँकांचा संप

डेबिट, क्रेडिट कार्डवर मिळणार ‘ही' विशेष सुविधा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा