Advertisement

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन १७४ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२३ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १७४ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन १७४ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी (२३ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १७४ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,२४९ झाली आहे. 

सोमवारी बेलापूर ३४, नेरुळ २७, वाशी २३, तुर्भे १८, कोपरखैरणे १२, घणसोली २४ ऐरोली मध्ये ३६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर २६, नेरुळ १८, वाशी ११, तुर्भे ५, कोपरखैरणे ८, घणसोली १२, ऐरोलीमध्ये १६ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४, ८७२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९६१ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १४१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा -

यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी

महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी 'फेस रिडर' यंत्रणा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा