पालिका रुग्णालयांमध्ये मोफत गर्भनिरोधक...‘अंतरा’!


SHARE

एका बाळानंतर लगेच दुसरे बाळ होऊ नये, म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा कंडोम वापरला जातो. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला असून हा नवा पर्याय आहे ‘अंतरा’ इंजेक्शन.

मध्यंतरी गर्भपाताची औषधे, एमटीपी किट या शेड्यूल एच-1 मधील गर्भपाताच्या औषधांची बेकायदा ऑनलाईन विक्री होत असल्याचे समोर आल्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने अशी उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली होती.


3 महिन्यांतून एकदाच

नावावरुनच या इंजेक्शनचे नाव असे का ठेवले ते कळू शकेल. ‘अंतरा’ हे एक गर्भनिरोधक इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन महिलांना 3 महिन्यांतून एकदा घ्यावे लागणार आहे. येत्या 11 जुलैपासून सर्व महापालिका रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध होणार आहे.

'जागतिक लोकसंख्या दिना'निमित्त सर्व शासकीय रुग्णालय आणि प्रसुतिगृहांमध्ये 'अंतरा'ची माहिती देणारा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात 'इंजेक्टेबल गर्भनिरोधक' (डीएमपीए) महिलांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सध्याही बऱ्याच रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन मोफत मिळत आहे.कसे घ्यावे इंजेक्शन?

  • प्रसुती, गर्भपातानंतर 18 ते 45 वयोगटातील स्त्रियांना
  • दर तीन महिन्यांनी
  • स्तनदा मातांनाही इंजेक्शन घेता येते
  • दीर्घकालीन, अत्यंत प्रभावी गर्भनिरोधक
  • इंजेक्शन बंद केल्यास पुन्हा गर्भधारणा


कुटुंबनियोजनासाठी हे इंजेक्शन महत्त्वाचे आहे. एका बाळानंतर लगेच दुसरे बाळ नको असल्यास गोळ्या घेण्यापेक्षा हे इंजेक्शन घेतले तर आईला तेवढा त्रास होणार नाही. हे इंजेक्शन म्हणजे कायमस्वरुपी इलाज नाही. स्तनदा मातांमध्ये गोळ्यांचा पर्याय टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र हे इंजेक्शन स्तनदा माताही घेऊ शकतात.


- डॉ. पद्मजा केसकर, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी

गर्भनिरोधक म्हणून मागील काही वर्षांमध्ये इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधकाचा पर्याय पुढे आला. आजवर खासगी दवाखान्यात दिले जाणारे हे इंजेक्टेबल गर्भनिरोधक यापुढे शासकीय रुग्णालयांतही दिले जाईल.

पालिकेची सर्व रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालये, चिकित्सालये यामध्ये हे इंजेक्शन अगदी मोफत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त महिला आणि मातांनी या इंजेक्शनचा उपयोग करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हे देखील वाचा -

'या' एक्स-रे कक्षाला वाली कोण?

200 टक्क्यांनी वाढले 'सिझेरियन'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या