Advertisement

ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरातच डेंग्यूची लागण


ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरातच डेंग्यूची लागण
SHARES

ठाणे महानगरपालिका अायुक्तांनी ठाण्यातील वाहने रिपेअरिंगच्या सर्व दुकानांसमोर निकामी टायर्स दिसल्यास, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे अादेश पावसाळ्याअाधीच दिले होते. पण ज्या अायुक्तांनी हे अादेश दिले, त्या संजीव जयस्वाल यांच्या घरातीलच दोन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर अालं अाहे. म्हणजे ठाणे शहराला अाजारांपासून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संजीव जयस्वाल यांच्याच घरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्यामुळे विविध चर्चांना उधाण अालं अाहे.


पत्नी, मुलीवर उपचार सुरू

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण झाल्याचं निदान अाहे. त्यांची पत्नी आणि मुलीवर सध्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


असे दिले होते अादेश

पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या उपाययोजना म्हणून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे विभागातील वाहने रिपेअर करणाऱ्या सेंटरमधील निकामी टायर्सवर कारवाई करण्याचे अादेश दिले होते. पावसाचे पाणी टायर्समध्ये साचल्यानंतर डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरियासारख्या अाजारांची लागण होऊ शकते. यावर निर्बंध म्हणून आयुक्तांनी हे पाऊल उचललं होतं, मात्र आता त्यांच्याच घरात डेंग्यूची लागण झाली आहे.


हेही वाचा -

सावधान...देशात वाढत चालला आहे कर्करोग !

शिक्षण एमबीबीएस.... पण पगार सहा हजार रुपये; डॉक्टर्स डे स्पेशल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा