Advertisement

दहिसर मेट्रो - 7 कारशेडचा मार्ग अखेर मोकळा!


दहिसर मेट्रो - 7 कारशेडचा मार्ग अखेर मोकळा!
SHARES

दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-7 प्रकल्पातील सर्वात मोठा अडसर अखेर दूर झाला आहे. मेट्रो-7 प्रकल्पातील दहिसर कारशेडसाठी विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीची 40  एकर जागा आता लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात येणार आहे. ही जमीन कारशेडसाठी देण्यास विमानतळ प्राधिकरणाने होकार दिला असून या जागेच्या हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे आता मेट्रो-7 प्रकल्प फास्ट ट्रॅकवर येणार हे नक्की.

16.5 किमी मार्गाच्या आणि अंदाजे 6208 कोटी खर्चाच्या मेट्रो-7 चे काम सध्या वेगात सुरू आहे. मात्र या प्रकल्पातील कारशेडचा प्रश्न सुटला नव्हता. दहिसर येथे कारशेड बांधण्यासाठी एमएमआरडीएला विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीची 40 एकर जागा आवश्यक होती. ही जागा मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून एमएमआरडीएची धडपड सुरू होती. दरम्यान दहिसर येथील विमानतळ प्राधिकरणाच्या या 40 एकर जागेच्या मोबदल्यात विमानतळ प्राधिकरणाला गोराईतील एमएमआरडीएच्या मालकीची 42 एकर जागा देण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने ठेवला होता.

जमिनीच्या मोबदल्यात जमीन देण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतरही दहिसर कारशेडसाठी जागा मिळवणे एमएमआरडीएला शक्य दिसत नव्हते. अखेर विमानतळ प्राधिकरणाने ही जागा देण्यास होकार देत एप्रिल 2017 मध्ये एमएमआरडीए आणि विमानतळ प्राधिकरणामध्ये यासंबंधीचा करार झाला. त्यानंतर जमीन हस्तांतरणासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने या हस्तांतरणाला मंजुरी दिली आहे.



हेही वाचा

मेट्रो ३ प्रकल्पाला भूखंड देणारच नाही, १५ भूखडांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा