Advertisement

तुम्हालाही व्हर्जिन बायकोच हवी का?


तुम्हालाही व्हर्जिन बायकोच हवी का?
SHARES

बऱ्याच दिवसांनी मला माझी मैत्रिण भेटली. तिचे लग्न ठरल्यापासून तिला आमच्यासाठी वेळच नव्हता म्हणून मी चिडवत तिला विचारलं.. काय मॅडम , मिळाला का वेळ आम्हाला भेटायला ? झाली का लग्नाची सर्व तयारी? त्यावर तिने एकदम रडायलाच सुरवात केली. मला समजेच ना नक्की काय झालंय, आणि त्यावर तिने मला जे उत्तर दिलं त्यावर माझा विश्वासच बसेना. ''माझ लग्न मोडलंय." मी त्याला सांगितलं '' आय एम नॉट वर्जिन'' आणि तिथेच सर्व संपलं.

गेले कित्येक महिने एकत्र घालवल्यानंतर ती ' व्हर्जिन ' नाही म्हणून त्याने लग्न मोडलं? ही गोष्ट डोक्यातून जातच नव्हती.

रात्रभर ह्या गोष्टीचा विचार करून मी खूप अस्वस्थ झाले. न राहून मी गूगलवर ' व्हर्जिन' ( वर्जिन ) असं टाकून पाहिलं तर मला ' कैसे चेक करे की लडकी की सील टूटी है या वर्जिन है ? , कैसे पता करे आपकी गर्लफ्रेंड वर्जिन है या नही?, वो वर्जिन है या नही ! यह पता लगाना अब आसान 'अशा बऱ्याच  गोष्टी सापडल्या. म्हणजे गूगल वर हे सर्व सर्च केलं जातं. हे पाहून मी आणखीनच अस्वस्थ झाले. ' व्हर्जिन ' हि गोष्ट एखाद्याचं असं आयुष्य बदलवू शकते हि गोष्ट समजून घेणं मलातरी कठीण जातंय.

२१ वा शतकात हे बदललं ,ते बदललं असं आपण किती वेळा म्हणतो. मग 'व्हर्जिनिटी' या विषयावर अर्ध्याहून बहुतांश लोकांचे विचार अजूनही जुनाट का ? पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून स्त्री त्याच्याबरोबर काम करते. मग हीच गोष्ट पुरुषाला का चालत नाही ? मी ह्याबद्दल मुलांशी बोलायचं ठरवलं आणि मला मिळालेली ही तरी तुमच्यााबरोबर शेअर करतेय.  

* " माझ्यासाठी मुलगी 'व्हर्जिन' असण्यापेक्षा स्वभावाने चांगली असणं मला गरजेचं वाटत. माझं जिच्याशी लग्न होणार आहे ती मुलगी कशी वागते , माझ्या घरच्यांना किती समजून घेते हे माझ्यासाठी गरजेचं आहे. लग्न ही अशी गोष्ट आहे ज्यात आपण एकमेकांना किती समजून घेतो, एकमेकांसाठी किती सॅक्रिफाइज करतो हे जास्त महत्वाचं आहे. आपल्या सोसायटी मध्ये अजूनही लग्नाआधी व्हर्जिन असणं गरजेचं असावं, असं समजणारी लोक आहेत. पण मला हव्या असलेल्या गोष्टी त्या मुलींमध्ये असतील तर  ती मुलगी व्हर्जिन आहे कि नाही ह्या गोष्टीचा मला काही फरक पडत नाही."

- अविनाश पायाळ ( कोरिओग्राफर )


* " माझं लग्न नुकतंच झालंय आणि ते ही लव्ह मॅरेज , पण माझं लग्न होण्याआधी मी स्वतः व्हर्जिन नव्हतो. मग मी माझ्या होण्याऱ्या बायकोला तिच्या व्हर्जिनिटीवरून कसं पारखू ? माझ्यासाठी ती महत्त्वाची होती, तिचं व्हर्जिन असणं नाही. आणि किती मुलं लग्नाआधीही व्हर्जिन असतात? जर आपण स्वतः त्या कॅटेगरी मध्ये बसत नाही तर मुलीकडूनही ती अपेक्षा करणं मला तरी चुकीचं वाटतं."

- मयूर फडाले  (ट्रेकिंग ग्रुप संस्थापक )


*" माझ्यासाठी मुलीचा स्वभाव आणि तिने व्हर्जिन असणं ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. मी अजून व्हर्जिन आहे आणि मला वाटतं की माझं ज्या मुलीबरोबर लग्न होईल तिने ही व्हर्जिन असावं. याचं कारण मला सांगता येणार नाही. पण हो, मला व्हर्जिन बायकोच हवी.''

- संकेत शर्मा ( वेब डिझायनर )

*" एखाद्या मुलीला ती ' व्हर्जिन ' आहे की नाही ह्यावरून पारखून ठरवणं तिच्याशी लग्न करायचं की नाही, याचा अर्थ तुमची वैचारिक पातळी खूपच खालची आहे असंच म्हणावं लागेल. पण जर मला व्हर्जिनिटी आणि स्वभाव पहायचं असेल तर नक्कीच मुलाचा स्वभाव माझ्यासाठी खूप महत्वाचा असेल. एखाद्या मुलीने तिची व्हर्जिनिटी ती प्रेम करते त्या मुलासाठी घालवली असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की, ती वाईटच असेल. यात जराही शंका नाही की, आपण अशा सोसायटीचा भाग आहोत जिथे व्हर्जिनिटीबद्दल नेहमी महिलांना विचारलं जातं. दुर्दैवाने आपली सोसायटी मुलीच्या स्वभावापेक्षा तिच्या व्हर्जिनिटीला जास्त महत्त्व देते .पण मला तसं नाही वाटतं."

-नेमिश गांधी ( इंजिनिअरिंग विद्यार्थी )


*" 'व्हर्जिन' ही नक्की भानगड तरी काय आहे ? म्हणजे मुलगा वयात येतो आणि जेव्हा जेव्हा त्याला शक्य होईल तेव्हा तो शरीरसुख मिळवतो. त्याला सेक्स करावासा वाटला की त्याच्या इच्छा तो पूर्ण करतो मग मुलीनेच का लग्नाआधी 'व्हर्जिन' 'असावं? प्रत्येकाच्या मानसिक आणि शारीरिक गरजा असतात आणि पुरूष त्या भागवतोच. मग स्त्रीने लग्नाआधी तिच्या आयुष्यात अशी  काही परिस्थिती आली असेल तिथे तिची व्हर्जिनिटी गेली असेल तर तिला त्या गोष्टीवरून ती वाईट की चांगली हे का ठरवावं?"

-सुहास बोराडे ( विद्यार्थी )


* "माझ्या मते मुलीनी लग्नाआधी व्हर्जिन असावंच , माझं लग्न ठरतंय. त्यामुळे सध्या मुली बघणं सुरु केलंय. मी जिच्याशी लग्न करणार ती मुलगी मला व्हर्जिन हवी. त्यामुळे मी मुलीला हा प्रश्न विचारतो की ती व्हर्जिन आहे का ? मला मुलीच्या स्वभावाबरोबरच ही गोष्ट सुद्धा महत्वाची वाटते."

- ऋषी पत्रे ( टॅटू आर्टिस्ट )


*" माझ्यासाठी मुलीचा स्वभाव जास्त महत्वाचा असेल. ह्यात जराही शंका नाही की, मुलीच्या आयुष्यातली ही खूप महत्वाची गोष्ट आहे, तशीच ती मुलाच्याही असते. माझी गर्लफ्रेंड जर मला स्वतःहून सांगतेय तिच्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट सांगतेय, की ती व्हर्जिन नाही ह्याचा अर्थ तिचा माझ्यावर तेवढा विश्वास आहे आणि मी त्याचा आदर करायला हवा. प्रत्येक व्हर्जिन मुलाला वाटतं की मला व्हर्जिनच मुलगी मिळावी, पण हे २१ वं शतक आहे. तर मग अशा गोष्टींच्या तरी का अपेक्षा कराव्यात ? त्या मुलीच्या भूतकाळात तिने काय केलंय किंवा जर तिचं अफेअर असेलच आणि त्यातून जर हे झालं असेल आणि तो तिला सोडून गेला असेल तर ह्यात तिचाच दोष आहे असं का मानायचं ? दुसरी गोष्ट जर ती मुलगी स्वभावाने खूप चांगली असेल. माझं आणि तिचं बॉण्डिंग खूप चांगलं असेल तर मला तिच्या' व्हर्जिन ' असण्याचा आणि नसण्याचा काही फरक पडत नाही."

-भूषण पाटील ( इंजिनीअर )


"व्हर्जिनिटी की स्वभाव ह्या पेक्षा मला असं वाटत हा प्रश्न, व्हर्जिन असणं खरंच एवढं महत्वाचं आहे का? असा असावा. 'प्रेम' फक्त ही एकच गोष्ट नाही ज्यामुळे तुमचं नातं घट्ट होऊ शकतं. ह्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमचं नातं टिकवण्यासाठी गरजेच्या असतात. समजूतदारपणा आणि विश्वास हे घटक तेवढेच महत्वाचे आहेत. कुणालाही स्वीकारताना जर तुम्ही त्याच्यात असलेल्या गोष्टी बघून निवडता तर तुम्ही प्रेम करतानाही तू व्हर्जिन आहेस का? हा प्रश्न प्रेम करण्यापूर्वी विचारणार का?  ' आणि तिच्या उत्तरावर तुम्ही तुमचं मत ठरवत असाल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. तुम्ही प्रेमासारख्या सुंदर गोष्टीवर व्हर्जिनिटी सारख्या गोष्टीचा परिणाम कसा होऊ देऊ शकता ? Love is to Be cherished and your girl is to be preserved! तिचा आणि तिच्या निर्णयाचा आदर करा. "

- आकाश खेमानी ( इंजिनिअरिंग विद्यार्थी )

"मी विचारलेल्या १५ मुलांपैकी किमान १२ मुलांनी  तरी 'व्हर्जिनिटी ' प्रेक्षा स्वभाव आणि मुलगी महत्वाची असं सांगितलं. आणि खरंच मला हे ऐकून आता बरं वाटतंय. पुरुषांची मानसिकता महिलांच्या बाबतीत थोडी थोडी आणि हळूहळू का होईना बदलतेय,  ह्याचा मला आनंद आहे. मला मुलांना दोष द्यायचा नाही किंवा त्यांच्या विचारांवर कोणती कमेंटही करायची नाहीय. मी अशाही मुली पाहिल्या आहेत ज्यांना व्हर्जिन मुलगाच लग्नासाठी हवाय. पण हे प्रमाण खूप कमी आहे. आपण ज्या बाबीला एवढं महत्त्व देतोय, ती खरंच तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी तेवढी महत्वाची ठरावी का? हा प्रश्न लग्नासाठी मुलीला पारखताना स्वतःला एकदा तरी नक्की विचारा."




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा