Advertisement

या '९' टिप्सच्या मदतीनं घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी

खराब पाण्यामुळे किंवा अधिक वेळ ओलाव्यात राहण्यानं आपल्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. आज आम्ही अशीच काही माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे त्वचेची काळजी घेऊ शकता.

या '९' टिप्सच्या मदतीनं घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी
SHARES

मुंबईत जरा तरी पाऊस पडला की सखल भागात पाणी भरायला सुरुवात होते. जोरात पडला तर मुंबईची तुंबई व्हायला काही वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत दरवेळी सुट्टी घेणं काही शक्य नसतं. पाऊस येऊदे, वादळ येऊदे किंवा आणखी काही होऊदे जॉबवर तर जाणं आवश्यकच असतं. मग साचलेल्या पाण्यातून कसं बसं आपण ऑफिस गाठतो. पण खराब पाण्यामुळे किंवा अधिक वेळ ओलाव्यात राहण्यानं आपल्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. आज आम्ही अशीच काही माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे त्वचेची काळजी घेऊ शकता.

१) पावसाळ्यात जास्त उद्भवणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. यापासून बचाव करायचा असेल तर त्वचा जास्त काळ कशी ओली राहणार नाही याची काळजी घ्यायची. याशिवाय घरी सकाळी आणि रात्री कोमट पाण्यापासून आंघोळ करणं आवश्यक आहे. गरज पडल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानं योग्य ती क्रिम आणि पावडर फंगल झालेल्या भागावर लावू शकता.

२) तळपायाच्या भेगा वैगरे असलेल्या व्य्कींचा संपर्क साचलेल्या दूषित पाण्याशी आला तर पटकन जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. अशा वेळेला पायाला सूज येऊन ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे आंघोळीनंतर शरीराचे सर्व अवयव तपासून पाहणे. शरीरावर कुठे पुळ्या उठल्या नाहीत ना हे तपासून पाहणे.

३) पायाच्या बोटांच्या गॅपमध्ये ओलाव्यामुळे चिखल्या होतात. ती जागा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. दोन बोटांमध्ये टिश्यू पेपर किंवा सुक्या कपड्यानं वारंवार पाय पुसून घ्यावेत. जेणेकरून त्या भागातील दमटपणा कमी होईल.

४) पावसाळ्यात कपडे दमट राहतात. असे कपडे वापरल्यानं बुरशीचं इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. प्रसंगी इस्त्री करून ते कोऱे करावेत. जाड कापडाचे, पटकन न वाळणारे कपडे घालणं टाळावं.


फवारणी न केलेल्या भाज्या खायच्यात? मग मातीविना टेरेसवर फुलवा शेत मळा


५) पावसात भिजून ऑफिसला गेलात तर कपडे बदलावेत. यासाठी ऑफिसला जाताना कपड्यांचा एखादा जास्तीचा जोड ठेवावा.

६) पावसाळ्यात त्वचा फारशी कोरडी पडत नाही. त्यामुळे मॉइश्चरायझचा वापर करू नये.

७) कायम बंद असणाऱ्या शरीराच्या भागावर टाल्कम पावडर लावावी.

८) पावसाळ्यात बूट, मोजे घालणं टाळावं. बूट वापरत असालच तर ते हवेवर पूर्ण वाळेपर्यंत घालू नका. सँडल्स किंवा फ्लोटर्सचा वापर करावा. कारण ते पटकन वाळतात.  

९) ऑफिसला जाताना जमल्यास पूर्ण बंद असलेले रबरचे बूट वापरावे. विशेषतः जर पायांना जखमा असतील तर फ्लोटर्ससारख्या चप्पलांचा वापर टाळावा. ऑफिसमध्ये बुटांचा जास्तीचा जोड ठेवावा म्हणजे ओल्या बुटांमुळे होणारे टीनिया पेडीस आणि चिखल्यांसारखे आजार टाळता येतील.हेही वाचा

सायकल चालवण्याचे हे फायदे वाचाल तर बाईक विसराल

फ्री वायफाय वापरताय? मग तुमच्या खाजगी माहितीवर डल्ला पडू शकतो

संबंधित विषय
Advertisement