Advertisement

फ्री वायफाय वापरताय? मग तुमच्या खाजगी माहितीवर डल्ला पडू शकतो

फ्री वायफाय वापरणं तुमच्या अंगलट देखील येऊ शकतं हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला फ्री वायफाय वापराचे तोटे सांगणार आहोत.

फ्री वायफाय वापरताय? मग तुमच्या खाजगी माहितीवर डल्ला पडू शकतो
SHARES

हल्ली इंटरनेटशिवाय आपलं पानही हालत नाही. इंटरनेट नसेल तर जणू सर्व कामच अडतात, असा आपला आव असतो. त्यात बहुतांश ठिकाणी मिळणारी फ्री वायफाय सेवा. सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफाय असे बोर्ड लावलेले तुम्ही पाहिलेच असतील. मग काय तासनतास तिकडे बसून वायफायच्या मदतीनं व्हिडिओ, चित्रपट, गेम असं डाऊनलोड केलं जातं. पण फ्री वायफाय वापरणं तुमच्या अंगलट देखील येऊ शकतं हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला फ्री वायफाय वापराचे तोटे सांगणार आहोत.

१) आपल्या घरी आपल्या वायफाय नेटवर्कमध्ये आपण म्युझिक फाईल्स, प्रिंटर किंवा महत्त्वाच्या फाईल्स शेअर करू शकता तसंच दुसऱ्या कॉम्प्युटरद्वारे रिमोट लॉगीनला सुद्धा परवानगी देऊ शकता. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक वायफायला जोडले जाता त्यावेळी वरील सर्व सेटिंग्ज डिसेबल करा. जेणेकरून दुसरी कुठली व्यक्ती तुमचा कॉम्प्युटर अॅक्सेस करून हॅक करू शकत नाही.

२) आपले स्मार्ट फोन, टॅब्लेट बरेचदा आपोआप उपलब्ध असलेल्या कुठल्याही वायफाय हॉटस्पॉटला जोडले जाऊ शकतात. अशा प्रकारचं सेटिंग आपल्या डेटा सुरक्षिततेसाठी अतिशय घातक आहे. वायफायचे ऑप्शन डिसेबल ठेवण्यासाठी प्रथम फोनच्या सेटिंग्ज अॅपचा वायफाय विभाग उघडा आणि ते सेटिंग बंद करा.

३) सार्वजनिक नेटवर्कवर ब्राऊझर करण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरणे. काही व्हीपीएन सर्व्हिसेस मोफत उपलब्ध आहेत. परंतु पैसे भरून मिळविलेल्या व्हिपीएनच्या सर्व्हिसमध्ये कनेक्शन चांगलं राहतं.


अश्लिल साईट्सपासून वाचवणारं 'भजन अ‍ॅप'


४) आपण आपल्या प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळे पासवर्ड वापरले पाहिजेत. पण वेगवेगळे सांकेतिक शब्द लक्षात ठेवणं जरा कठीण जातं.

५) कधीकधी हॅकर्स विनामूल्य वायफाय मिळणाऱ्या ठिकाणी स्वत:चं बनावट वायफाय नेटवर्क तयार करतात आणि आपण खरं नेटवर्क सोडून बनावट नेटवर्कला जोडले जातो. बनावट नेटवर्कशी आपण जोडले जाणे म्हणजे आपला डेटा अयोग्य माणसांच्या हाती लागणे. जर तुम्हाला खात्रीपूर्वक कनेक्शनचं नाव माहीत नसेल तर तिथल्या संबंधीत व्यक्तीकडून तुम्ही ते जाणून घ्या आणि योग्य नेटवर्कला कनेक्ट व्हा.

६) असुरक्षित नेटवर्कशी कनेक्ट केलेलं असताना सगळ्यात मोठा धोका असतो तो व्हायरसचा. आपल्या सिस्टीमशी कधीही तडजोड करू नका. नेहमीच चांगल्या कंपनीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर चालू ठेवा.हेही वाचा

पेटीएमची मेट्रो प्रवाशांकरिता 'मेट्रो रूट सर्च' सुविधा

रस्ता चुकल्यास गुगल मॅप्स करणार अलर्ट
संबंधित विषय
Advertisement