Advertisement

पेटीएमची मेट्रो प्रवाशांकरिता 'मेट्रो रूट सर्च' सुविधा

पेटीएम आपल्या ग्राहकांना आणखी आकर्षक सुविधा देणार आहे. पेटीएम कंपनीनं मेट्रो रूट सर्च सुविधा सुरु करणार असल्याचं जाहीर केलं असून, या सुविधेचा फायदा मेट्रो रेल प्रवाशांना होणार आहे.

पेटीएमची मेट्रो प्रवाशांकरिता 'मेट्रो रूट सर्च' सुविधा
SHARES

चित्रपटांच्या तिकीटापासून अनेक गरजेच्या वस्तू ग्राहकांना पेटीएमवरून ऑनलाईन विकत घेता येतात. तसंच मोबाइल रिचार्ज आणि बँकांचे व्यवहारसुद्धा पेटीएमद्वारे ऑनलाईन पद्धतीनं करता येतात. या सर्व आत्याधुनिक सुविधा पेटीएम या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट्स कंपनीनं सुरू केल्या आहेत. अशातचं आता पेटीएम आपल्या ग्राहकांना आणखी आकर्षक सुविधा देणार आहे. पेटीएम कंपनीनं मेट्रो रूट सर्च सुविधा सुरु करणार असल्याचं जाहीर केलं असून, या सुविधेचा फायदा मेट्रो रेल्वे प्रवाशांना होणार आहे.

१० शहरांमध्ये सुविधा

पेटीएम कंपनीची ही सुविधा मेट्रो रेल्वे सुविधा असलेल्या मुंबईसह दिल्ली, नोयडा, गुडगाव, बंगळूरहैदराबाद, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, कोची आणि जयपूर या १० शहरांमध्ये उपलब्ध आहे. या सुविधेर्तंगत प्रवाशांना निघण्याचं स्थान आणि पोहोचण्याचं ठिकाणं तसंच यासाठी लागणारा मार्गाची माहिती मिळणार आहे. त्याशिवाय प्रवासासाठी लागणारा अंदाजित वेळ, भाडे, मध्ये येणारी स्टेशन्स आणि लाइन बदलण्यासाठीची स्टेशन्स याबाबत देखील माहिती मिळणार आहे.

सुखकर प्रवास 

पेटीएममध्ये आम्ही सतत आमच्या ग्राहकांचा प्रवास सुखकर कसा करता येईल याचा विचार करत असतो. आपल्या प्रवासाचं आयोजन करण्यासाठी प्रवाशांना आम्ही या रुपानं आणखी एक सोयिस्कर साधन उपलब्ध करत आहोत. अॅपवर हे फीचर सक्रिय केल्यानंतर काही तासांतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आम्हाला दिसून आलं. आमच्याकडं सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी अशी इतर अनेक नावीन्यपूर्ण फीचर्स विचाराधीन आहेत, जी आमच्या यूझर्सचा प्रवासाचा अनुभव अधिक सुधारतील, असं पेटीएमचे उपाध्यक्ष अभिषेक राजन यांनी म्हटलं.

असा करा सुविधेचा वापर

  • पेटीएम अॅप उघडा आणि ‘मेट्रो’ आयकॉनवर क्लिक करा.
  • तुमचे शहर निवडा आणि रूट सर्चवर क्लिक करा.
  • तुमचे आरंभाचे आणि पोहोचण्याचे ठिकाण निवडा आणि रस्ते पाहण्यासाठी सर्च बटणावर क्लिक करा.
  • हे फीचर तुम्हाला रस्ता सुचवेल आणि निवडलेल्या दोन स्टेशनसाठीची प्रवासाला लागणारी वेळही दाखवेल.



हेही वाचा -

वर्ल्डकप सामन्यावर सट्टा लावताना पोलिस उपनिरीक्षक अटकेत

महाराष्ट्रात क्षयरुग्णांच्या संख्येत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा