निवडणुकीच्या तोंडावर अंधेरीत तरणतलावाचं लोकार्पण

 Andheri
निवडणुकीच्या तोंडावर अंधेरीत तरणतलावाचं लोकार्पण

अंधेरी - अत्याधुनिक गाळणी यंत्र विभाग आणि नूतनीकरण केलेला तरणतलावाचा लोकार्पण सोहळा शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलनात सोमवारी पार पडला. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या तलावाचं लोकार्पण केलं. या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी केलं होतं.

शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल महानगर पालिकेच्या अखत्यारीत येणारं हे जलतरण तलाव आहे. या जलतरण तलावाचं नूतनीकरण करून सौंदर्यकरण करण्यात आलं. मुंबईत जलतरणपटू तयार व्हावेत, तसंच सामान्य नागरिकांना याचा फायदा व्हावा यासाठी या तलावाचं नूतनीकरण करण्यात आलं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच अशी विकास कामं शिवसेना नेहमी करत राहणार असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. तसेच सर्वच पक्ष निवडणूक समोर ठेऊन काम करतात. 'शिवसेना अभ्यास करून पास होते कॉपी करत नाही असा टोला विरोधकांना या वेळी आदित्य ठाकरेंनी लगावला. या उद्घाटन प्रसंगी महापौर स्नेहल आंबेकर, आमदार अनिल परब, आदेश बांदेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे महिला विभाग संघटक राजुल पटेल युवा सेनेचे सचिन नायक उपस्थित होते.

Loading Comments