यम्मी... मेदूवडा मस्जिदचा

मस्जिद बंदर - आवळा, कडीपत्ता आणि जिऱ्याच्या स्वादानं वेगळीच चव देणारी नारळाची हिरवी चटणी, मस्त झणझणीत लाल चटणी, पारंपरिक दक्षिण भारतीय आंबट-गोड सांबार आणि सोबतीला मेदूवडे. आ... हा... नक्कीच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल... कधी आवड म्हणून, कधी गरज म्हणून स्वस्त आणि मस्त मेदूवड्याला खवय्यांची नेहमीच पसंती मिळते. मस्जिद बंदरच्या जंजीकर स्ट्रीटवर मेदूवड्याचा असाच एक अड्डा आहे. अण्णा स्पेशल मेदूवडा-सांबार... इसकी बातही कुछ और... 30 वर्षापूर्वी करीआप्पांनी सुरू केलेली ही दाक्षिणात्य परंपरा त्यांचा नातू संदिल कुमार आता पुढे नेतोय...

मेदूवडा-सांबार विक्रीचा हा छोटासा स्टॉल. पण गर्दी प्रचंड. फक्त वडा-सांबारच नाही तर इथली इडली, डाळवडा आणि डोसाही चवीनं खाल्ला जातो. तुम्हालाही चांगल्या मेदूवड्याची चव चाखायची असेल, तर इथे भेट द्यायला विसरू नका.

Loading Comments