महात्म्य धनत्रयोदशीचं

 Pali Hill
महात्म्य धनत्रयोदशीचं
महात्म्य धनत्रयोदशीचं
See all

मुंबई - धनत्रयोदशी...दिवाळीतला महत्त्वाचा दिवस... असं मानतात की, या दिवशी जो दीपदान करेल त्याच्या कुटुंबात अकाली मृत्यू होत नाही. एका प्राचीन कथेत हा इतिहास सांगण्यात आलाय. दिव्यांबरोबरच वस्त्रं, फराळाचंही दान केलं जातं. आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीही साजरी केली जाते. व्यापारी या दिवशी हिशोब लिहिण्याच्या वह्या खरेदी करतात. या दिवशी सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूची स्वच्छता करून पूजा केली जाते. तसंच या दिवशी विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी या देवतांचंही पूजन केलं जातं.

Loading Comments