Advertisement

इंग्रजीच्या भीतीला करा बाय बाय!

अनेकांच्या कार्यालयात इंग्रजीमध्येच कामकाज चालतं. कामकाजच काय हल्ली इंग्रजीतच संभाषण, मुलाखती होतात. पण अनेकांच्या मनात इंग्रजीची भीती असते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

इंग्रजीच्या भीतीला करा बाय बाय!
SHARES

आपल्यापैकी अनेकांना इंग्रजीची भीती वाटते. मराठीवर प्रेम असलं, तरी आधुनिक युगात इंग्रजी शिकणं हे गरजेचं झालं आहे. कारण अनेकांच्या कार्यालयात इंग्रजीमध्येच कामकाज चालतं. कामकाजच काय हल्ली इंग्रजीतच संभाषण, मुलाखती होतात. पण अनेकांच्या मनात इंग्रजीची भीती असते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मनातून इंग्रजीची भीती निघून जाईल.




१) मराठीसोबतच इंग्रजीवर प्रेम असायला हवं. इंग्रजी शिकलं तर तुमच्या मराठीपणा लोप पावत नाही. त्यामुळे इंग्रजीतून विचार करायला शिका.



२) इंग्रजी वर्तमानपत्र आठवड्यातून तीन-चार वेळा वाचा. त्यातल्या किमान ५-६ शब्दांचे अर्थ समजून घ्या. इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवल्यानं वाक्याची बांधणी करणं सोप्पं जाईल.



३) इंग्रजी सिनेमा, मालिका पाहण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला सिनेमे किंवा मालिका 'सबटायटल'सह वाचा. पहिले काही सिनेमे तुम्हाला कळणार नाहीत. पण नियमित इंग्रजीत सिनेमे पाहिल्यावर तुम्हाला हळूहळू इंग्रजी कळू लागेल. यामुळे वारंवार इंग्रजी शब्द आणि उच्चार तुमच्या कानी पडतील.


४) रोज अर्धा तास तरी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करा. ज्यांना इंग्रजी येतं त्यांच्याशी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही चुकत असाल तर ते सुधारतील.



५) वर्तमानपत्र वाचणं चांगलं आहेच. पण यासोबतच इंग्रजी साहित्य वाचणं देखील आवश्यक आहे. इंग्रजी पुस्तकं वाचल्यानं देखील तुमच्या शब्दसंग्रहात वाढ होईल. मोठी मोठी पुस्तकं न वाचता सुरुवातीला लहान पुस्तकं वाचा. अगदी कॉमिक पुस्तकं वाचली तरी चालतील. कारण त्यात सोप्या भाषेत इंग्रजी असतं.


6) तुम्हाला गेम खेळायला आवडत असेल, तर तुम्ही पजल्स खेळू शकतात. हल्ली असे अनेक गेम आहेत, ज्यामुळे तुम्हाला इंग्रजीचे नवीन शब्द कळतात.



हेही वाचा-

स्ट्रॉबेरीचं नव्हे, हे तर 'पुस्तकांचं गाव'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा