Advertisement

स्ट्रॉबेरीचं नव्हे, हे तर 'पुस्तकांचं गाव'


स्ट्रॉबेरीचं नव्हे, हे तर 'पुस्तकांचं गाव'
SHARES

लालेलाल स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर. मुंबईहून काही तासांच्या अंतरावर वसलेलं छोटसं हिल स्टेशन. या हिल स्टेशनच्या आजूबाजूला वसली अाहेत अनेक छोटी-छोटी गावं. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगाच्या कुशीत पहुडलेली कौलारू बांधणीची गावं. यापैकीच एक गावं म्हणजे भिलार. महाबळेश्वरला जाताना मध्येच या गावाचा रस्ता आहे. चढ-उतार असलेला रस्ता पार करत आत गेल्यावर मूळ भिलार गाव दिसतं.



पुस्तकांचा सुगंध दरवळतोय

स्ट्रॅबेरीचं गाव म्हणून ओळखलं जाणारं हे गाव सध्या एका वेगळ्या कारणांसाठी ओळखलं जातंय. आता या गावात स्ट्रॉबेरीचा नाही तर नव्याकोऱ्या पुस्तकांचा सुगंध दरवळतोय. होय अगदी बरोबर वाचलंत तुम्ही... महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीनं पुस्तकांचं गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ब्रिटनमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर हे पुस्तकांचं गाव साकारलं आहे.



पुस्तकांची वस्ती

महाबळेश्वरच्या डोंगरकुशीत स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या या गावात तब्बल पंधरा हजाराहून अधिक पुस्तकं वस्तीला आहेत. पुस्तकांचं गाव या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीनं गावातील २५ ठिकाणं निश्चित केली अाहेत. गावातील मंदिर, स्थानिक नागरिकांची घरं, हॉटेल, लॉज, शाळा अशा ठिकाणी पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या समितीनं कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, क्रीडा विषयक, विज्ञान विषयक साहित्य, वैचारिक साहित्य, चरित्र. आत्मचरित्र अशा २५ हून अधिक वाड्मय प्रकारांची निवड केली आहे.


आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने

भिंती चित्रांनी सजल्या आहेत आणि घरीदारी वाचक-पर्यटकांसाठी स्वागताची तोरणं लावली आहेत. या प्रकल्पासाठी स्वत्व या स्वयंसेवी संस्थेच्या सुमारे ७५ चित्रकारांनी गावातील निवडलेल्या २५ ठिकाणांची रंगरंगोटी करून सुशोभीकरण केलं आहे. या प्रकल्पात स्थानिकांना सहभागी करण्यावर अधिक भर दिला आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल हे मात्र नक्की.



तुम्हाला सुद्धा पुस्तकांच्या गावाला भेट द्यायचीय? मग एका विकेंडला भिलार या गावाची सैर करा आणि इथं असलेल्या पुस्तकांमध्ये रमून जा.



हेही वाचा

'पुस्तकांचं उद्यान...' या, बसा आणि वाचा!

आता घरपोच वाचनालय!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा