जगावेगळ्या छंदोपासकांचा मेळा

Dadar (w), Mumbai  -  

दादर - दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करणे आणि त्यांचं संवर्धन करणे असा छंद अनेकांना असतो. अशाच छंदोपासकांसाठी दादरमध्ये 'छंदोत्सव 2017' हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेल्या अनेक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.

या प्रदर्शनात कॅनव्हासवर काढलेली पेंटिंग, कागदापासून बनवलेले गणपती, बुकमार्क्स, ओरिगामी, दोऱ्याचे आणि फॅब्रिक कलर्सचे भरतकाम, करवंटीसारख्या टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू यांचाही समावेश आहे.

Loading Comments