गणपती बाप्पा भक्ताच्या मनात असतात त्यांना पाहण्यासाठी डोळ्यांची नाही तर मनाची दृष्टी लागते आणि हे सिद्ध करून दाखवलंय मुंबईतल्या सायन इथं राहणाऱ्या रमा शाह यांनी. रमा शाह घरीच गणपतीची मूर्ती बनवतात. हे ऐकल्यावर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की यामध्ये वेगळं काय ? पण त्या फक्त मूर्ती बनवत नाहीत तर डोळ्याला पट्टी बांधून गणपतीची मूर्ति साकारतात. विश्वास बसत नाही ना. मग तुम्हीच स्वतःच पहा.