Advertisement

धार्मिक विधीतच नाही तर आरोग्यसाठीही वापला जातो कापूर

कापूर अनेक आजार दूर करण्यासाठी एक औषधी घटक म्हणून वापरला जातो. कापूर किंवा कापराचे तेल वापरणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

धार्मिक विधीतच नाही तर आरोग्यसाठीही वापला जातो  कापूर
SHARES

धार्मिक विधीत हमखास कापूर वापरला जातो. कापूर फक्त पूजा-आरती दरम्यानच नाही. तर या व्यतिरीक्तदेखील त्याचा वापर करता येऊ शकतो. विशेष करून आरोग्यासाठी कापूर फायदेशीर आहे. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही कापूर अनेक आजार दूर करण्यासाठी एक औषधी घटक म्हणून वापरला जातो. कापूर किंवा कापराचे तेल वापरणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आम्ही सांगणार आहोत.

१) शरीराच्या कोणत्याही भागावर खाज सुटली असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून हे मिश्रण खाज सुटलेल्या जागी लावावं. यामुळे जागा थंड पडून तुम्हाला लवकर आराम मिळेल.

२) सांधेदुखीच्या त्रासावर कापूर हे अत्यंत गुणकारी औषध आहे. वेदना होत असलेल्या जागी कापूरचे तेल लावून मालीश करा. यामुळे वेदना दूर होतील.

३) केस काळेभोर, लांब, मजबूत करण्यासाठी अथवा डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी कापूर उपयुक्त आहे. यासाठी कापूरचे तेल तुमच्या रोजच्या वापराच्या तेलात मिसळून हलक्या हातानं केसांची मालीश करा.

४) डँड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी कापराचा वापर करता येऊ शकतो. खोबऱ्याच्या तेलात कापूर मिश्रित करून केसाला लावून मसाज करा. अर्ध्या तासांनंतर केस धुवून टाका.

५) टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडेसे कापूर आणि मीठ टाकून त्यात थोडावेळ पाय सोडून बसा. त्यानंतर पाय आणि टाचा स्क्रब करून त्यावर मॉस्चराइजर क्रिम लावा. यामुळे टाचांच्या भेगा नष्ट होऊन पाय एकदम मुलायम होतील.

६) जखम झालेल्या ठिकाणी कापूरमध्ये पाणी मिक्स करून लावा. कापूरमध्ये अँटीबायोटिक्स असतात जे जखम बरी करण्यास मदत करतात.

७) दातांमध्ये वेदना होत असतील तर त्या जागेवर कापूर पावडर लावा. दाताचे दुखणं कमी होईल.

८) जळले किंवा भाजले असेल तर कापूरचे तेल खूप उपयोगी आहे. या तेलानं त्वचेची आग कमी होते.

९) कापूर, ओवा आणि पेपरमिंट यांचे व्यवस्थित मुरलेले मिश्रण साखरेच्या सरबतात टाकून घेतल्यानं पोटदुखी थांबते.



हेही वाचा

रोजच्या आहारात राजगिरा 'असा' ठरू शकतो फायदेशीर

जेवणाशिवाय रोजच्या वापरात 'असा' होतो मीठाचा उपयोग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा