कायस्थ खाद्य यज्ञ !

    मुंबई  -  

    मुलुंड - पाणीपुरी, शेवपुरी,  दाबेली असं चटपटीत खाणं तुम्हाला आवडतं का? आणि हो तुम्ही नॉन व्हेजही आवडीनं खाता का? या दोन्ही प्रश्नांना तुमचं उत्तर हो असेल तर तिसरा प्रश्न आहे हे चटपटीत आणि नॉनव्हेज असं एकसाथ मिळालं तर...? हे शक्य करते सीकेपी खाद्यसंस्कृती. मुलुंडमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या फुड फेस्टिव्हलमध्ये खास सीकेपी पद्धतीची मेजवानी होती. चिकन पाणीपुरी, चिकन शेवपुरी, खिमा कटलेट, जवळा दाबेली, कोळंबी खिचडी अशा एकसे बढकर एक पदार्थांचा आस्वाद इथे खवय्यांना घेता आला. मुलुंड मंडळानं पहिल्यांदाच आयोजित केलेल्या कायस्थ खाद्य यज्ञ नावाच्या या फेस्टिव्हलमध्ये सीकेपी महिलांनी पाककौशल्य दाखवलं. दोन दिवसांच्या या फुड फेस्टिव्हलला खवय्यांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. फुड फेस्टिव्हल सोबतच बिझनेस करणाऱ्यांनाही उत्तम असा प्लॅटफॉर्म या निमित्तानं मिळाला. या सीकेपी खाद्ययज्ञामुळे खवय्यांच्या पोटातली भूक प्रज्वलीत करून शांतही केली हे मात्र नक्की.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.